भाक्रामध्ये 625.26 लाख युनिट विजेची विक्रमी निर्मिती

भाक्रामध्ये 625.26 लाख युनिट विजेची विक्रमी निर्मिती

अमृतसर, वृत्तसंस्था : भाक्रा नांगल-बियास व्यवस्थापनने बोर्डाने (बीबीएमबी) एका दिवसात (28 जुलै) 625.26 लाख युनिट वीज निर्मिती करून मागचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. याच दिवशी बीबीएमबी 2 हजार 784 मेगा वॅट वीज निर्माण करून 22 जुलै रोजीचा 2 हजार 733 मेगावॅट विजेचा विक्रम मोडला आहे.बीबीएमबीच्या आकडेवारीनुसार, 21 ऑगस्ट 2008 मध्ये 604.24 लाख युनिट विजेचे विक्रमी उत्पादन केले होते. त्यानंतर सुमारे 15 वर्षांनंतर हा विक्रम मोडला आहे.

याशिवाय भाक्राच्या डाव्या बाजूच्या पावर हाऊसचे काम बीबीएमबीने जून 2023 मध्ये पूर्ण केले. त्यामुळे या पावर हाऊसची वीज निर्मितीची क्षमता 540 मेगावॅटवरून 630 पर्यंत पोहोचली. जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सतलज आणि बियास नदीचे पाणी भाक्रा आणि पांग तलावात साठवण्यात आले. त्यामुळे पंजाब आणि हरियाणाला महापुराचा धोका काही अंशी कमी झाला. खालच्या भागात पुराचे पाणी कमी झाले त्यावेळी बीबीएमबी दोन तलावांतून नियंत्रित पाणी सोडत आहे. यामुळे विजेचे विक्रमी उत्पादन करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news