पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आज देशभरात पार पडत आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीतील NOTA या पर्यायावरील याचिकेवर महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. नोटापेक्षा कमी मते मिळणाऱ्या उमेदवारावर सर्व निवडणुकात ५ वर्षांसाठी बंदी घालावी, तसेच "NOTA ला बहुमत मिळाल्यास फेरनिवडणूक घ्यावी' यासंबंधित नियम करण्याचे आयोगाला निर्देश देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहेत. (Lok Sabha Election)
NOTA पेक्षा कमी मते मिळविणाऱ्या उमेदवारांना 5 वर्षांच्या कालावधीसाठी सर्व निवडणुका लढवण्यापासून रोखले जाईल, "काल्पनिक उमेदवार" म्हणून NOTA चा योग्य आणि कार्यक्षम अहवाल प्रसिद्धी सुनिश्चित करण्यासाठी नियम तयार करावेत, NOTA ला बहुमत मिळाल्यास, विशिष्ट मतदारसंघात झालेली निवडणूक रद्दबातल घोषित केली जाईल. तसेच संबंधित मतदारसंघात नवीन निवडणूक घेतली जाईल, असे नियम तयार करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत. अशी मागणी याचिकेत याचिकाकर्त्याने केली आहे. या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. (Lok Sabha Election)