पुणे: रवींद्र धंगेकरांनी घेतली खासदार गिरीश बापट यांची भेट

पुणे: रवींद्र धंगेकरांनी घेतली खासदार गिरीश बापट यांची भेट

पुणे, पुढारी ऑनलाईन: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा पराभव केल्यानंतर त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. २००९ आणि २०१४ च्या कसबा पेठ विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी गिरीश बापट यांना चांगलीच फाईट दिली होती. बापट आणि धंगेकर या दोन्ही नेत्यांमध्ये आजवर अनेक वेळा आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे १० हजार ९४० मतांनी विजयी झाले. तर, भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा दारुण पराभव झाला आहे. गुरुवारी विजयानंतर धंगेकर यांनी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी जाऊन टिळक कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, कुणाल टिळक यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर शुक्रवारी धंगेकर यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. यावेळी खासदार गिरीश बापट यांनी धंगेकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छादेखील दिल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news