IND vs AUS1st test : अश्‍विन @450 ! ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

IND vs AUS1st test : अश्‍विन @450 ! ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि ऑस्‍ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून ( दि. ९ ) नागपूर येथे सुरु झाला आहे. ऑस्‍ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र ऑस्‍ट्रेलियाचा निम्‍मा संघ केवळ १०९ धावांमध्‍येच तंबूत परतला. या सामनात एलेक्स कैरी विकेट घेत भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज अश्‍विन याने कसोटीमधील ४५० बळी पूर्ण केले. ही कामगिरी करताना त्‍याने आपल्‍या नावावर नवा विक्रमही नोंदवला आहे. ( IND vs AUS1st test )

IND vs AUS1st test : अश्‍विनच्‍या नावावर नवा विक्रम

अश्‍विन याने ८९ सामन्‍यांमध्‍ये ४५० बळी पूर्ण केले आहेत. ४५० बळींचा टप्‍पा पूर्ण करण्‍यासाठी अनिल कुंबळेला ९३ कसोटी सामने खेळावे लागले होते. त्‍यामुळे अश्‍विन हा सर्वात जलद ४५० विकेट घेणारा  भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटच्‍या इतितहासात सर्वात जलद ४५० विकेट घेण्‍याचा विक्रम श्रीलंकेच्‍या मुथय्‍या मुरलीधरन याच्‍या नावावर आहे. त्‍याने केवळ ८० सामन्‍यांमध्‍ये ४५० बळी पूर्ण केले होते.

हरभजन सिंगलाही टाकणार मागे

या मालिकेत हरभजन सिंगचा विक्रम मागे टाकण्‍याची संधी अश्‍विन याला असणार आहे. भारत आणि ऑस्‍ट्रेलिया कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणार्‍या फिरकी गोलंदाजामध्‍ये हरभजन सिंग दुसर्‍या क्रमाकावर आहे. त्‍याने १८ सामन्‍यांमध्‍ये ९५ विकेट घेतल्‍या आहेत. हरभजनला मागे टाकण्‍यासाठी अश्‍विन याला केवळ सात विकेट घेण्‍याची गरज आहे. या मालिकेतील चार सामन्‍यात अश्‍विन हा विक्रम सहज मोडेल, असे मानले जात आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news