रावेर लोकसभा 2024 : सकाळच्या सत्रात दोन तासात रावेर 7.14 टक्के तर जळगाव 6.14 टक्के

रावेर लोकसभा 2024 : सकाळच्या सत्रात दोन तासात रावेर 7.14 टक्के तर जळगाव 6.14 टक्के

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदानाला सकाळी सात वाजेपासून प्रारंभ झालेला आहे. जळगाव व रावेर या लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये जळगाव 6.14 टक्के तर रावेर 7.14 टक्के मतदान झालेले आहे. राज्यातील दुसऱ्या सर्वाधिक क्रमांकचे मतदान सकाळच्या सत्रात रावेर लोकसभेच्या मतदारसंघात झालेले आहे. विशेष म्हणजे मुक्ताईनगर या ठिकाणी 8.20 टक्के मतदान पहिल्या दोन तासात झालेले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मतदान हे रावेर लोकसभा मतदारसंघात 7.14 टक्के मतदान झालेले आहे. तर राज्याचे संकट मोचक नामदार गिरीश महाजन यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये 6.20 टक्के मतदान झालेले आहे. रावेर लोकसभेत भुसावळ 7.50 चोपडा 7.13 जामनेर 6.20 मलकापूर 8.12 मुक्ताईनगर 8.20 रावेर 5.6 टक्के मतदान झालेले आहे. जळगाव लोकसभेमध्ये सात ते नऊ या दरम्यान 6.14 टक्के मतदान झालेले आहे. यामध्ये अंमळनेर 5.73 चाळीसगाव 5.10 एरंडोल 7.94 जळगाव सिटी 4.76 जळगाव ग्रामीण 7.3 तर पाचोरा 6.93 टक्के मतदान झालेले आहेत.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पारधी येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पारधी येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

जळगाव मतदार संघामध्ये सर्वाधिक मतदान हे जळगाव ग्रामीण म्हणजे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात झालेले आहेत तर सर्वाधिक कमी मतदान हे अमळनेर तालुका म्हणजे नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या मतदारसंघात झालेले आहे. यापेक्षाही कमी मतदान हे जळगाव लोकसभेत महाराष्ट्राचे संकट मोचक नामदार गिरीश महाजन यांचे जवळचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या मतदारसंघात म्हणजे चाळीसगाव मध्ये 5.10 टक्के झालेले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news