भाग्य दिले तू मला : रत्नमाला मोहिते उत्साहात साजरी करणार मंगळागौर

भाग्य दिले तू मला
भाग्य दिले तू मला

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवरील आपल्या सगळ्यांची आवडती भाग्य दिले तू मला मालिकेत रत्नमाला मोहिते मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसणार आहेत. श्रावण महिना म्हटलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर उभे राहतात ते श्रावण (भाग्य दिले तू मला) महिन्यातील सण. श्रावण महिना आला की, चाहूल लागते ती सणांची. श्रावण सुरू झाल्यावर येणारे श्रावणी सोमवार, महादेवाची पूजा, पण त्यातही मंगळागौर म्हटलं की, महिलांचा विशेष उत्साह दिसून येतो. कारण मंगळागौर हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय.

मंगळागौरीची चांगलीच जय्यत तयारी करण्यात आली आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कावेरीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे, साजेसे असे दागदागिने देखील परिधान केले आहेत. सगळ्याच महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी नेसली आहे. कावेरी इतर महिलांसोबत मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहे. कारणही तसंच आहे. आता हे काय कारण आहे ते लवकरच प्रेक्षकांना कळेल.

मालिकेत मंगळागौर साजरी करण्यात येणार आहेच. परंतु, सानिया मात्र या आनंदाच्या क्षणात मिठाचा खडा टाकणार आहे. रत्नमाला मोहित आणि कावेरीला कसं दूर करता येईल, याचा कट रचणार आहे. मंगळागौरीची पारंपरिकरित्या पूजा करण्यात येणार आहे. मंगळागौरीची पूजा पार पडते आणि त्यानंतर खेळांना सुरुवात होते. पण, याच उत्साहाच्या वातावरणात आता कोणता नवा ट्विस्ट येणार? काय घडणार? हे पाहणं खूप उत्सुकतेचं आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news