Yogesh Kadam on Anil Parab : …म्हणून आमच्या घरगुती वादात अनिल परबांनी ठिणगी टाकली: योगेश कदम

Yogesh Kadam on Anil Parab : …म्हणून आमच्या घरगुती वादात अनिल परबांनी ठिणगी टाकली: योगेश कदम
Published on
Updated on

खेड, पुढारी वृत्तसेवा: संजय कदम यांना निवडणुकीत फायनान्सर मिळावा, म्हणून आमच्या घरगुती वादात ठिणगी टाकण्याचे काम ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केले आहे, असा घणाघाती आरोप दापोलीचे शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी केला. ते खेड येथे आज (दि.५) पत्रकार परिषदेत बोलत होते. Yogesh Kadam on Anil Parab

यावेळी आमदार कदम यांनी अनिल परब यांच्या आरोपांचा समाचार घेताना म्हणाले की, मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांना टारगेट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी अतिशय खालच्या दर्जाची टिप्पणी केली आहे. वास्तविक संजय कदम यांना दापोली विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत असताना फायनान्सर मिळावा म्हणून आमच्या कौटुंबिक वादात परब यांनी ठिणगी टाकली आहे. Yogesh Kadam on Anil Parab

आमच्या काकांचा त्यांनी वापर करून घेतला. रामदास कदम व त्यांचे बंधू सदानंद कदम एकत्र येऊ नयेत, यासाठी प्रयत्न करत राहिले. त्या दोघांमध्ये भांडण लावायची आणि स्वतः त्याचा फायदा करून घ्यायचा, ही नीती वापरून अनिल परब यांनी आमच्या घरामध्ये फूट पाडण्याचे काम केले आहे.

आमच्या घरातील वाद हा आम्ही आमच्या चार भिंतीमध्ये सोडवू, पण अशा प्रकारे जाहीर पत्रकार परिषदेमधून जर अनिल परब आमच्या कौटुंबिक वादाचा उल्लेख करत असेल. तर ते किती खालच्या पातळीवर जाऊन आरोप करत आहेत, हे लक्षात येते. कोकणातील एकाही पर्यटन व्यवसायिकाला धक्का पोहोचणार नाही, याची पूर्ण खबरदारी आमदार म्हणून मी घेईन. वेळ पडल्यास त्यांच्यासोबत जाऊन उभा राहील. सीआरझेड कायद्यामुळे व साई रिसॉर्टवरील कारवाईमुळे सर्व पर्यटन व्यावसायिकांना धोका निर्माण होऊ दिला जाणार नाही, असेही कदम यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news