राजापूर ; पुढारी वृत्तसेवा बारसू सड्यावर आंदोलकांना भेटण्यासाठी चाललेल्या खासदार विनायक राऊत व सेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांना राजापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
आज (शुक्रवार) सकाळी बारसू येथील सड्यावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना भेटण्यासाठी शिवसेना सचीव, खासदार विनायक राऊत हे सेना पदाधिकाऱ्यांसह चालले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना जाण्यास मज्जाव केला. यावेळी विनायक राऊत यांनी रस्त्यावरच पदाधिकाऱ्यांसह ठिय्या मारला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
खासदार राऊत यांच्या समर्थनार्थ राजापूर पोलीस ठाण्याबाहेर शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक जमा होवू लागले आहेत. खासदार राऊत यांना नक्की कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले ते मात्र समजू शकले नाही. दरम्यान गुरुवारी रात्री नाणार प्रकल्प विरोधी आंदोलनाचे नेते अशोक वालम व त्यांचे सुपुत्र विनेश वालम यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.
हेही वाचा :