कर्नाटक विधानसभा निवडणूक : निवडणूक प्रचारासाठी वाढली हेलिकॉप्टरची मागणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात १० मेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदानाला आता केवळ काही दिवसांचाच वेळ राहिला आहे. राज्यात प्रचाराची रणधुमाळी टिपेला पोहोचली आहे. जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे. तशी अनेक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना राज्यभर फिरण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी वाढली असल्याचे चित्र आहे.

काँग्रेस आणि भाजप पक्षाचा विचार करता त्यांना राज्यातील विविध मतदारसंखात फिरण्यासाठी हेलिकॉप्टरची गरज निर्माण झाली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, कर्नाटक राज्य काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. राज्यातील अनेक भागात या नेत्यांना प्रचाराला वेळेत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी वाढली आहे. दिवसाला तीन ते चार ठिकाणी पोहोचायला त्यांना हेलिकॉप्टरीची मागणी वाढली आहे.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बेळगाव, बंगळूर शिमोगा, गुलबर्गा येथे हेलीकॉप्टर उतरण्याचीसोय आहे. त्यामुळे नेते हेलिकॉप्टरने जातात आणि त्या शेजारील मतदारसंघात जाऊन प्रचार सभा घेतात. राज्यात भाजपने सर्वात जास्त हेलिकॉप्टरची नोंदणी केली आहे. कारण भाजपच्या प्रचारासाठी अन्य राज्यांतूनही वरिष्ठ नेते प्रचारासाठी येणार आहेत. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. यांच्या अनेक राष्ट्रीय नेते प्रचारासाठी कर्नाटकात येणार आहेत. त्यांच्यासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितानुसार, भाजपकडून दिवसाला ४० हेलिकॉप्टरची नोंदणी केली आहे. ही हेलीकॉप्टर फक्त नेत्यांसाठीच नसून त्यांच्यासह अंगरक्षकांसाठीही आहे. दुसरीकडे काँग्रेसचा विचार करता अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, वरिष्ठ नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी राज्यभर विविध मतदारसंघात प्रचार करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसनेही दिवसाला १० ते २० हेलिकॉप्टर बुक केली आहेत.

हेलिकॉप्टर पुरवणाऱ्या एजन्सींच्या दरामध्येही विविधता असते. हेलीकॉप्टरचे भाडे तासाला आकारले जाते. काही हेलिकॉप्टर एजन्सी तासाला २.१० लाख ते २. ३० लाख रुपये आकारतात. तसेच दिवसाला भाडे आकारणाऱ्या एजन्सी आहेत. सिंगल इंजिन असणाऱ्या हेलिकॉप्टरचे भाडे ७ लाख तर डबल इंजिन असलेल्या हेलिकॉप्टरचे दिवसाला भाडे १० लाख असते. ही सर्व हेलिकॉप्टर चार
आसनक्षमतीची असतात. तसेच सहा आसनी क्षमता असलेली हेलिकॉप्टर हैदराबाद येथून मागवली जातात. निवडणूक आयोगाचीही या हेलिकॉप्टर भरारीवर बारीक नजर असते

अन्य राज्यातून केली जात आहे मागणी

राज्यातील सर्वच एजन्सीकडे मागणीनुसार हेलीकॉप्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक पक्षांनी आंध्रप्रदेश, महाराष्ट्र तसेच दिल्लीहूनही अनेक हेलिकॉप्टर एजन्सीकडे मागणी नोंदवली आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news