रत्‍नागिरी : खेडमध्ये पोलिसांना लाच देताना एकाला अटक

रत्‍नागिरी : खेडमध्ये पोलिसांना लाच देताना एकाला अटक

खेड (जि.रत्‍नागिरी), पुढारी वृत्तसेवा :  ट्रक लाकूड साठ्यासह सोडून देण्यासाठी लोटे येथील सहायक पोलिस निरीक्षक यांना लाकूड व्यापारी लाच देण्याचे आमिष दाखवत होता. यावेळी त्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्‍यानंतर त्‍याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, दत्तात्रय बाळू कदम हे खेड पोलिस ठाणे अंतर्गत लोटे दुरक्षेत्र येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक आहेत. निजाम हुसेन पटाईत (वय 50, रा गोवळकोट रोड, जि. रत्नागिरी ) हा लाकडाचा व्यापारी आहे. त्याचा वाहतूक करणारा ट्रकावर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी यांनी कारवाई केली. त्‍यानंतर लोटे पोलिस दुरक्षेत्र येथे ठेवला होता. व्यापा-यांने त्याबाबत झालेला दंड भरला होता.

सदर ट्रकमधील लाकडाबाबत वनविभागाने कारवाईचा प्रस्ताव पाठवू नये. तसेच लाकडासह ट्रक सोडून देण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक कदम यांना ५ हजार रुपये लाच देण्याबाबत बोलला होता. याबाबत कदम यांनी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने सापळा रचून कदम यांना ३ हजार रुपयांची लाच देताना रंगेहाथ पकडले.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news