डोळ्यांच्या स्कॅनिंगनेही मिळणार रेशनचे धान्य

डोळ्यांच्या स्कॅनिंगनेही मिळणार रेशनचे धान्य

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : डोळ्यांच्या स्कॅनिंगद्वारेही आता रेशनवरील धान्य मिळणार आहे. 'आयरिस' स्कॅनरची सुविधा असलेली ई-पॉस मशिन आता धान्य दुकानदारांना दिली जाणार आहे. यामुळे धान्य वितरणातील अडचणी कमी होणार आहेत.

अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना रेशनवरून मोफत धान्य दिले जाते. या धान्याचे वितरण ई-पॉस मशिनद्वारे होते. लाभार्थ्यांच्या हाताचे ठसे या ई-पॉस मशिनवरून घेऊन त्याची ओळख पटवली जाते. त्यानंतरच धान्याचे वितरण होते. कष्टकरी, दिव्यांग, वयोवृद्ध तसेच कुष्ठरुग्णांना हाताचे ठसे योग्य पद्धतीने उमटत नसल्याने त्याचा मोठा फटका बसत होता. दहा वर्षांपूर्वी आधार नोंदणी झालेली असल्याने अनेकदा काहींच्या हाताचे ठसे जुळत नसल्याने धान्य वितरणात अडचणी येत होत्या. यावरून दुकानदार आणि नागरिकांत वादावादीचे प्रसंग अनेकदा घडत आहेत. हे ई-पॉस मशिन बदलून द्यावे, अशी मागणी धान्य दुकानदारांकडून सातत्याने होत होती. या सर्व पार्श्वूमीवर राज्य शासनाने आता सर्वच दुकानदारांना आयरिस प्रणालीसह ई-पॉस मशिन दिली जाणार आहेत. यामुळे नागरिकांच्या हाताचे ठसे जुळले नाहीत अथवा त्यात अडचणी आल्या, तरी डोळ्यांचे स्कॅनिंग करून त्यांची खात्री केली जाईल आणि धान्य वितरण होईल. लवकरच सर्व दुकानदारांकडे या नव्या सुविधेसह ई-पॉस मशिन कार्यरत होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news