Animal Trailer: आला रे आला! रणबीर कपूर-रश्मिका मंदानाच्या ‘ॲनिमल’चा ट्रेलर आला
पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाचा १ डिसेंबर रोजी चित्रपट 'ॲनिमल' रिलीज होणार आहे. तत्पुर्वी ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. (Animal Trailer) ट्रेलरच्या आधी रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाला मुंबईत एका कार्यक्रमात पाहण्यात आले. या कार्यक्रमात 'ॲनिमल'चे निर्माता अनिल थडानी आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगादेखील उपस्थित होते. (Animal Trailer)
संबंधित बातम्या –
संदीप रेड्डी वांगा यांनी फॅन्सना गूड न्यूज देत सोमवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'ॲनिमल'च्या ट्रेलरच्या रिलीज डेटचा खुलासा केला होता. त्यांनी रणबीर कपूर सोबत आपला एक फोटो शेअर करत 'ॲनिमल'ची ट्रेलर रिलीज डेटची घोषणा केली होती. त्यांनी लिहिलं होतं की, "२३ नोव्हेंबर रोजी ट्रेलर."
बुर्ज खलीफावर रिलीज झाला होता ॲनिमलचा टीजर
दुबईत बुर्ज खलीफावर ॲनिमलचा टीजर जारी करण्यात आला होता. या खास क्षणांसाठी रणबीर कपूर आणि बॉबी देओलदेखील पोहोचले होते. यावेळी बॉबी देओलदेखील हजर होता. रणबीर कपूरने हा स्पेशल मोमेंट आपल्या फोनमध्ये कैददेखील केला होता.
न