आजचे राशिभविष्य : जाणून घ्या आजचे (दि. १२ सप्टेंबर २०२१) राशिभविष्य नेमके काय घडणार आहे आज तुमच्या राशिमध्ये जाणून घ्या पुढारी ऑनलाईन द्वारे.
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष – प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. जुने आजार उद्भवतील. प्राणायाम, योगसाधना गरजेची आहे. मानहानीचे प्रसंग निर्माण होतील. संयमाने विषय हाताळावे लागतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ – जोडीदाराची साथ लाभेल. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन – नोकदारांसाठी लाभदायक दिवस. वाद-विवादामधे जय. आर्थिक प्रगती होईल.आप्त-स्वकीयांच्या मदतीने कार्यसिद्धी. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क – क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. विचारपूर्वक निर्णय घ्यावा. एकाग्रचित्ताने कामे करा. विद्यार्थ्यांनी आळस न करता अभ्यास करावा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह – आर्थिक नियोजनाअभावी ताण. कौटुंबिक कलह टाळा. संवाद साधणे फार महत्त्वाचे आहे. वाहन विषयक अडचणींचा सामना करावा लागेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या – आत्मविश्वासाने काम कराल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. धनप्राप्तीचे योग संभवतात. कलाकार व लेखकांना लाभदायक दिवस ठरेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तुळ – वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. ज्येष्ठांकडून योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.परस्परांमधील संवाद महत्त्वाचा आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक – नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. आतिथ्यामधे दिवस जाईल. मनासारख्या खरेदीचे योग संभवतात. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रसन्नता राहील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – ईर्ष्या, स्पर्धा यामुळे अस्वस्थता राहील. नम्रता, सहनशीलता आवश्यक आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. अनाठायी गोष्टींना प्राधान्य देऊ नका. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर – आनंददायी घटना घडतील. प्रसन्नता लाभेल. नव्या दिशा व धोरण यामुळे आर्थिक प्रगती होईल. उत्साह द्विगुणीत होईल. प्रयत्नांना यश मिळेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कुंभ – अनपेक्षित लाभ होतील. कौतुकास्पद कार्य कराल. वरिष्ठांची मर्जी राखाल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. सामाजिक व सांस्कृतिक विषयामध्ये मोलाची कामगिरी [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन – अतिविचारांमुळे मनःस्वास्थ्य बिघडेल. कृतीवर भर द्या. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. नियमांचे उल्लंघन नको. सत्य स्वीकारून पुढे जावे. [/box]