Sangli Crime | विवाहितेवर बलात्कार; व्हिडीओ केला व्हायरल

Sangli Crime | विवाहितेवर बलात्कार; व्हिडीओ केला व्हायरल
Published on
Updated on

कडेगाव, पुढारी वृत्तसेवा : कडेगाव तालुक्यातील एका गावातील 32 वर्षीय विवाहितेवर गावात व खानापूर तालुक्यामध्ये वारंवार बलात्कार केल्याची तक्रार नोंद झाली आहे. बलात्काराचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. (Sangli Crime)

पीडितेने कडेगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. संशयित सदरुद्दीन रहिमान मुलाणी (40, रा. ढाणेवाडी, ता. कडेगाव) यास अटक केली आहे. ही घटना मे 2023 मध्ये व खानापूर तालुक्यात 22 जुलै व 12 ऑगस्ट 2023 रोजी घडली.

संशयिताने पीडितेस तिचे इच्छेविरुद्ध लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन मे 2023 मध्ये तालुक्यातील एका गावात, त्यानंतर 22 जुलै 2023 रोजी रात्री पीडितेच्या सध्या राहत असलेल्या खोलीत (ता. खानापूर) जबरदस्तीने संबंध ठेवले. 12 ऑगस्ट 2023 रोजी संशयिताने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीडितेस फोन करून धमकी दिली. तिला खानापूर तालुक्यातील एका शहरात बस स्थानकालगत घरी बोलावून घेतले. त्यानंतर तिला मारहाण केली. जबरदस्तीने पुन्हा संबंध ठेवले व त्याचा व्हिडिओ तयार केला.

अशाप्रकारे पोलिसांनी आरोपीला केली अटक :

कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, पोलिस उपनिरीक्षक पडळकर यांच्यासह पोलिस पथकाने तपास सुरू केला. सांगली, सातारा जिल्ह्यात संशयिताच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केली. संशयित हा मार्डी (ता. माण, जि. सातारा) येथे असल्याची माहिती मिळाली होती. कडेगाव पोलिसांनी बुधवारी (दि. 11) सायंकाळी त्याला ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, पोलिस उपनिरीक्षक पडळकर तपास करीत आहेत.

दरम्यान, कडेगाव पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील संशयिताला कडेगाव येथील न्यायालयात हजर केले असता, येथील न्यायाधीश यांनी त्याला शनिवार (दि. 14) पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Sangli Crime)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news