‘रंगीले फंटर’मधील ‘त्या’ चार मित्रांचा अखेर झाला उलगडा

rangile funter movie
rangile funter movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाळकरी मित्रांची धमाल गोष्ट आपल्याला आगामी 'रंगीले फंटर' या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. ए. के. इंटरनॅशनल मुव्हीजच्या प्रशांत अडसूळ, शशिकांत अडसूळ यांनी 'रंगीले फंटर' चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले आहेत. या पोस्टरवरील ते चार मित्र नक्की कोण आहेत? याचा उलगडा या पोस्टरमधून झाला आहे. उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केलं आहे. हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या –

"रंगीले फंटर" या चित्रपटाच्या पोस्टरवर दोस्तीत कुस्ती नाय पाहिजे अशी टॅगलाईन देण्यात आली असून आता दोस्तीत नक्की कोणती कुस्ती होते, यासाठी अजुन जरा वाट पावी लागणार आहे.

या चित्रपटात अभिनेता हंसराज जगताप, रुपेश बने, यश कुलकर्णी, जीवन कऱ्हाळकर या चार मित्रांसोबत अभिनेते मिलिंद शिंदे, किशोर चौघुले, अभिनेत्री सिया पाटील, डॅनी अडसूळ, वैशाली दाभाडे, अरूण गीते अशी दमदार स्टारकास्ट आपल्या भेटीस येणार आहे. अक्षय गोरे यांनी कथा, पटकथा, संवाद लेखन, नितीन रायकवार, कौस्तुभ पणत यांनी गीतलेखन, राजा अली यांनी संगीत दिग्दर्शन, राजदत्त रेवणकर यांनी छाया दिग्दर्शन, फुलवा खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन आणि सिद्धेश मोरे यांनी संकलन केलं आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news