अंकिता-रणदीपचा स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंकिता लोखंडे आणि रणदीप हुड्डा स्टारर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या बहुप्रतीक्षित ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि प्रेक्षकांच्या मनात या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. अंकिता लोखंडे ट्रेलर लाँच कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही. परंतु तिने सोशल मीडियाद्वारे हा ट्रेलर शेअर केला आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांना विनायक दामोदर सावरकर यांचा प्रवास आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष दाखवणार आहे.

ट्रेलरमध्ये रणदीप हुड्डा आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लक्ष वेधून घेतो तर अंकिता लोखंडेने त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. प्रेक्षकांना चकित करणारी अंकिताची भूमिका नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या व्यक्तिरेखेतील रणदीपचा दृढ विश्वास आणि अंकिताने त्याची पत्नी 'यमुनाबाई'ची साकारलेली भूमिका उल्लेखनीय ठरणार आहे.

'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट रणदीप हुड्डा याने दिग्दर्शित केला आहे. आनंद पंडित, रणदीप हुडा, संदीप सिंग आणि योगेश रहार यांच्या भूमिका यामध्ये दिसणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर २२ मार्च, २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news