Indian Idol 14 हा प्रत्येकाला अभिमान वाटावा असा शो-रणबीर कपूर

Rashmika - Ranbir
Rashmika - Ranbir

पुढारी ऑनलाईन डेस्क – सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकप्रिय संगीत रिॲलिटी शो 'इंडियन आयडॉल १४' मध्ये (Indian Idol 14) 'शानदार परिवार स्पेशल' एपिसोड साजरा केला जाणार आहे. त्यामुळे आणखी एका धमाकेदार वीकएंडसाठी सज्ज व्हा. यावेळी शोमध्ये 'अॅनिमल' चित्रपटाचे कलाकार रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना उपस्थित असतील आणि ते केवळ स्पर्धकांनी सादर केलेल्या गाण्यांचा आनंद घेणार नाहीत तर प्रेक्षकांना रिझवणारे काही मनोरंजक किस्से देखील सांगतील. (Indian Idol 14)

टॉप-१४ स्पर्धक आपल्या कामगिरीने कुमार सानू आणि श्रेया घोषाल या परीक्षकांना प्रभावित करण्यासाठी मंचावर गेले. त्याआधी रणबीर कपूरने या प्रतिष्ठित संगीत शोबद्दल आपले विचार मांडले. तो म्हणाला, 'इंडियन आयडॉल' हा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, असा एक शो आहे. कारण या शोने ज्या प्रकारची प्रतिभा निर्माण केली आहे, त्यामुळे आपल्या देशाच्या संस्कृतीला खरोखरच वेगळा दर्जा प्राप्त झाला आहे. यासाठी, मी 'इंडियन आयडॉल' शो चे अभिनंदन करू इच्छितो."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news