Pran Pratishtha Ceremony : स्‍वप्‍नपूर्तीचे आनंदाश्रू…! उमा भारतींसह साध्वी ऋतंभरांच्‍या अश्रूंचा बांध फुटला…

अयाेध्‍येत राम मंदिर प्राण प्रतिष्‍ठा साेहळ्यापूर्वी भाजप नेत्या उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा यांना  अश्रू अनावर झाले.
अयाेध्‍येत राम मंदिर प्राण प्रतिष्‍ठा साेहळ्यापूर्वी भाजप नेत्या उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा यांना अश्रू अनावर झाले.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अयोध्या 'न भूतो न भविष्यती' सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. आज ५०० वर्षांची तपश्चर्या पूर्ण होत आहे. भगवान श्रीराम अयोध्येतील भव्य आणि दिव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. दरम्‍यान, आज अनेक वर्षांपासून पाहिलेले स्‍वप्‍न  वास्‍तवात उतरल्‍याने भाजप नेत्या उमा भारती ( Uma Bharti ) आणि साध्वी ऋतंभरा ( Sadhvi Rithambara ) यांना  अश्रू अनावर झाले. ( Ram Temple Pran Pratishtha ceremony)

स्‍वप्‍न वास्‍तवात उतरले आणि अश्रूंचा बांध फुटला…

श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री राम लल्लाच्या प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यघसाठी उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा उपस्‍थित राहिल्‍या आहेत. त्‍यांनी राम मंदिर आंदोलनात सहभाग घेतला. आता तब्‍बल तब्‍बल तीन दशकांहून अधिक काळनंतर स्‍वप्‍न वास्‍तवात उतरल्‍याने त्‍या भावूक झाल्‍या साध्वी ऋतंभरा यांनी उभा भारती यांना मिठी मारली. यावेळी त्‍यांना अश्रू अनावर झाले. अयोध्‍येमधील ऐतिहासिक राम मंदिर उभारणीच्‍या स्‍वप्‍नपूर्तीचे आनंदाश्रू हे सर्वच रामभक्‍तांमध्‍ये चर्चेचा विषय ठरला आहे.

राम मंदिर आंदोलनात भाजप नेत्‍या उभा भारती यांच्‍यासह साध्वी ऋतंभरा यांचा सक्रीय सहभाग होता. सुमारे ३० वर्षांपूर्वी राम मंदिर आंदोलना उत्तर भारतात या दोन्‍ही नेत्‍यांची चर्चा होत असे. साध्वी ऋतंभरा यांच्‍या हिंदीतील भाषणांच्‍या ऑडिओ कॅसेट्स मोठ्या प्रमाणावर ऐकल्‍या जात असत.

साध्वी ऋतंभरा या मूळच्‍यापंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील दोराहा येथील आहेत. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी हरिद्वार येथील स्वामी परमानंद गिरी यांना गुरू मानत संन्यास स्वीकारला. १९८० साली विश्व हिंदू परिषदेने जन जागरण अभियान सुरू केले होते. राम मंदिर आंदोलनातील सक्रीय सहभागानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. आता त्‍या वृंदावनमध्ये स्थायिक झाल्या असून, तेथे त्या वात्सल्यग्राम नावाने आश्रम चालवतात.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news