Ram Temple : राम मंदिरात लवकरच ‘प्राण प्रतिष्ठा’; या तारखेपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले

Ram Temple : राम मंदिरात लवकरच ‘प्राण प्रतिष्ठा’; या तारखेपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ram Temple : राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यापासून भाविक राम मंदिर दर्शनासाठी कधी खुले होणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता ही प्रतीक्षा लवकरच संपली आहे. कारण राम मंदिरात प्राण प्रतिष्ठेची तारीख जवळपास निश्चित झाली आहे. एबीपी न्यूज हिंदी ने याचे वृत्त दिले आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी याची माहिती दिली आहे. ते म्हणाले, 15 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 या दरम्यान राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होऊ शकते.

नृपेंद्र मिश्रा म्हणाले, प्राण प्रतिष्ठाच्या अंतिम दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना याचे आमंत्रण दिले जाईल. प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार 24-25 जानेवारी 2024 नंतर भाविक दर्शन घेऊ शकणार आहे. तसेच प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम विदेशात भारतीय दूतावासमध्येही पाहता येईल याची तयारी केली जात आहे.

राम मंदिराच्या गर्भ गृहाचे मुख्य द्वार सुवर्ण आच्छादित असेल. तसेच त्यावर सोन्याची Carving केली जाईल. तसेच मंदिराचे 161 फूट उंच शिखर देखील सोन्याने मढवण्यात येणार आहे.

हे ही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news