Rakul Preet Singh Marriage : लग्नासाठी रकुल प्रीत सिंग -जॅकी भगनानी गोव्यात दाखल (Video)

Rakul Preet Singh Marriage
Rakul Preet Singh Marriage
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 21 फेब्रुवारी रोजी दोघे लग्नगाठ बांधणार आहेत. नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा रंगणार आहे. ( Rakul Preet Singh Marriage )

संबंधित बातम्या  

गोव्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये हा सोहळा होईल. लग्नासाठी रकुल आणि जॅकी गोव्यात दाखल झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात दोघे गोवा विमानतळावर उभे असलेले दिसत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्यही आहेत. ( Rakul Preet Singh Marriage )

यावेळी रकुलने केशरी रंगाचा ड्रेस घातला होता, तर जॅकीने प्रिंटेड शर्ट आणि काळ्या रंगाची पँट घातली आहे. रकुल आणि जॅकी पर्यावरणस्नेही पद्धतीने लग्न करणार आहेत. दोघांनी लग्नात फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही, तर लग्न समारंभानंतर हे जोडपे वृक्षारोपणही करणार आहे. रकुल व जॅकीच्या कुटुंबीयांनी पाहुण्यांना आणि मित्र परिवाराला ई-इन्व्हिटेशन पाठविले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news