National Film Award 2023 : RRR साठी किंग सोलोमन यांना तर 777 Charlie साठी रक्षित शेट्टी यांना राष्ट्रीय पुरस्कार (Video)

अल्लू अर्जुन
अल्लू अर्जुन

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३ चित्रपट जगतातील सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्यापैकी एक आहे. या ॲवॉर्ड सेरेमनीमध्ये चित्रपट इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींना त्यांच्या शानदार, उत्कृष्ट कामासाठी सन्मानित केलं जातं. यंदाचा २०२३ चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा २४ ऑगस्‍ट रोजी करण्यात आली होती. आज १७ ऑक्‍टोबर रोजी राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या विजेत्यांना सन्मानित केलं. या ॲवॉर्ड शोमध्ये बॉलीवूड ते साऊथ चित्रपट इंडस्‍ट्रीतील अनेक सुपरहिट स्टार्सनी उपस्थिती लावली.

रक्षित शेट्टी
रक्षित शेट्टी

स्टंट कोरिओग्राफर किंग सोलोमन यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'RRR'साठी (National Film Award 2023) सर्वोत्कृष्ट ॲक्शन दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. तर रक्षित शेट्टी यांना सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट 777 Charlie साठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (National Film Award 2023) 'पुष्पा'साठी अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण सुरु आहे. आलिया भट्टला 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. कृती सेनॉनला 'मिमी'तील तिच्या भूमिकेसाठी सन्मानित करण्यात आले.

पहा विजेत्यांची यादी –

सर्वोत्कृष्ट अभिनेता अल्लू अर्जुन (पुष्पा)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी), कृती सेनॉन (मिमी)

सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग अभिनेता – पंकज त्रिपाठी (मिमी)

सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग अभिनेत्री – पल्लवी जोशी (द कश्मीर फाईल्स)

सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट- रॉकेट्री द नांबी इफेक्ट

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – आरआरआर

सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट (हिंदी)- सरदार उधम

सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट (कन्नड)- 777 चार्ली

सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट (तमिळ)- कदायसी विवासई

सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट (तेलुगु)- उपेन्ना

सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट (असामी)- अनुर

सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट (मल्याळम)- होम

सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी- आरआरआर

सर्वोत्कृष्ट लिरिक्स- कोंडापोलम

सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम- सरदार उधम

सर्वोत्कृष्ट एडिटिंग- संजय लीला भंसाली (गंगूबाई काठियावाड़ी)

सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले- गंगूबाई काठियावाड़ी

सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी- सरदार उधम

सर्वोत्कृष्ट डायरेक्टर – निखिल महाजन (गोदावरी, मराठी फिल्म)

सर्वोत्कृष्ट संगीत- पुष्पा (देवी श्री प्रसाद) , आरआरआर (एमएम कीरावनी)

स्पेशल ज्युरी ॲवार्ड – शेरशाह

सर्वोत्कृष्ट बुक ऑन सिनेमा- म्युझिक बाय लक्ष्मीकांत प्यारेलाल (लेखक – राजीव विजयकर)

सर्वोत्कृष्ट फिल्म ऑन सोशल इशू- अनुनाद

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news