Raksha Khadse Raver Lok Sabha | चार कामे सांगा विचारत कोचूर ग्रामस्थांचा रक्षा खडसेंना विरोध, घ्यावा लागला काढता पाय

Raksha Khadse Raver Lok Sabha | चार कामे सांगा विचारत कोचूर ग्रामस्थांचा रक्षा खडसेंना विरोध, घ्यावा लागला काढता पाय
Published on
Updated on

जळगाव- पुढारी वृत्तसेवा-  लोकसभा 2024 च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातही उमेदवार आपआपला प्रचार करीत आहे. भाजपाच्या विद्यमान खासदार व उमेदवार रक्षा खडसे यांचाही मतदारसंघात प्रचार दौरा सुरु आहे. दरम्यान रावेर तालुक्यांतील कोचूर गावात गेल्या असता गावकऱ्यांनी त्यांना घेरलं व विरोध केला. संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्या कामाचा जाब विचारला, त्यामुळे तेथून त्यांना काढता पाय घ्यावा लागला.

रावेर तालुक्यामध्ये महाविकास आघाडी व महायुती असा दोनही पक्षांचा प्रचार सुरु आहे. आपण आतापर्यंत काय विकास केला व  आपण निवडून आल्यावर काय करणार आहे असा जाब मतदार विचारु लागले आहेत. रक्षा खडसे दोन टर्म पासून रावेर च्या खासदार आहेत. त्यामुळे मतदार त्यांना जाब विचारत आहे.  रावेर तालुक्यातील कोचूर गावात आपल्या ताफ्यासह त्या आल्या असता गावकऱ्यांनी तिथेच थांबून तुम्ही गेल्या दहा वर्षात काय काम केले याचा जाब त्यांना विचारला.

लोकांनी चार कामे दाखवा असा प्रश्न रक्षा खडसेंना विचारला. यावेळी कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत हा विषय व या वादाला तिथेच थांबवले. त्यानंतर रक्षा खडसेंनी तेथून काढता पाय घेतला.  मात्र यावरुन आता मतदार नेत्यांना प्रश्न विचारू लागले आहेत, कामाचा जाब विचारु लागले आहेत. नेत्यांनाही जनतेला उत्तरे द्यावे लागणार आहेत असे दिसते आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news