Rajya Sabha Election : ‘हनुमान चालिसे’मुळे रवी राणांचे मत होणार बाद? शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाविकास आघाडीच्या ३ जणांनी राज्यसभा निवडणूक मतदान प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपाने करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनेही अमरावतीमधील अपक्ष पण भाजप समर्थक आमदार रवी राणांवर निशाणा साधत त्यांनी हनुमान चालीसा दाखवून मतदान केले आहे, तरी राणांचे मत बाद करावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता जोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोग या प्रकरणी निर्णय देत नाही तोवर मतमोजणी प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी आज शुक्रवारी मतदान झाले. सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदानाची वेळ ४ पर्यंत होती. पण त्यापूर्वीच बहुतांश आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यसभेसाठी एकूण २८५ आमदारांनी मतदान केले.

दरम्यान, मतदान झाल्यानंतर मतमोजणीपूर्वी भाजपने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाचे दार ठोठावले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वेळापत्रकानुसार मतमोजणीची प्रक्रिया सुरु होणार होती, मात्र त्याच वेळी भाजपने मतदानाच्या प्रक्रियेवर घेतलेले आक्षेप केंद्रीय निवडणूक आयोगाने नोंदवून घेतले आहेत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मतमोजणीच्या प्रक्रियेला विलंब झाला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्या मतांवर भाजपचे नेते आशिष शेलार आणि आमदार पराग अळवणी यांनी आक्षेप घेतला होता. या तिघांचे मत बाद करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली होती. परंतु राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपचा आक्षेप फेटाळला. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भाजपने तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेण्यात आली. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणी थांबवली आहे. दरम्यान, तीन मते बाद झाल्यास महाविकास आघाडीचा मार्ग खडतर होईल अशी चर्चा सुरू आहे.

दरम्यान, शिवसेनेने पलटवार करत भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावर आक्षेप घेऊन निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. राणा यांनी हनुमान चालीसा दाखवून मतदान केले. हनुमान चालीसा दाखवून इतर कुणाला मतदान केले हे उघड करणे नियमांचे भंग आहे असे शिवसेनेने म्हटले आहे. तसेच भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधातही तक्रार करण्यात आली आहे. मुनगंटीवार यांनी इतर व्यक्तीला मतपत्रिका दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आपल्यावर झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत रवी राणा म्हणाले की, हनुमान चालीसेचे पुस्तक खिशात घेऊन जाणे, विधान भवनात जाणे हा गुन्हा आहे का? असा सवाल केला आहे.

दुसरीकडे, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विटरवरून, 'राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडी चा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू झाला आहे, आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!!' असे म्हणत भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

महाविकास आघाडीच्या ३ जणांनी राज्यसभा निवडणूक मतदान प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपाने करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनेही अमरावतीमधील अपक्ष पण भाजप समर्थक आमदार रवी राणांवर निशाणा साधत त्यांनी हनुमान चालीसा दाखवून मतदान केले आहे, तरी राणांचे मत बाद करावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता जोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोग या प्रकरणी निर्णय देत नाही तोवर मतमोजणी प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी आज शुक्रवारी मतदान झाले. सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदानाची वेळ ४ पर्यंत होती. पण त्यापूर्वीच बहुतांश आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यसभेसाठी एकूण २८५ आमदारांनी मतदान केले.

दरम्यान, मतदान झाल्यानंतर मतमोजणीपूर्वी भाजपने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाचे दार ठोठावले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वेळापत्रकानुसार मतमोजणीची प्रक्रिया सुरु होणार होती, मात्र त्याच वेळी भाजपने मतदानाच्या प्रक्रियेवर घेतलेले आक्षेप केंद्रीय निवडणूक आयोगाने नोंदवून घेतले आहेत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मतमोजणीच्या प्रक्रियेला विलंब झाला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्या मतांवर भाजपचे नेते आशिष शेलार आणि आमदार पराग अळवणी यांनी आक्षेप घेतला होता. या तिघांचे मत बाद करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली होती. परंतु राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपचा आक्षेप फेटाळला. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भाजपने तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेण्यात आली. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणी थांबवली आहे. दरम्यान, तीन मते बाद झाल्यास महाविकास आघाडीचा मार्ग खडतर होईल अशी चर्चा सुरू आहे.

दरम्यान, शिवसेनेने पलटवार करत भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावर आक्षेप घेऊन निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. राणा यांनी हनुमान चालीसा दाखवून मतदान केले. हनुमान चालीसा दाखवून इतर कुणाला मतदान केले हे उघड करणे नियमांचे भंग आहे असे शिवसेनेने म्हटले आहे. तसेच भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधातही तक्रार करण्यात आली आहे. मुनगंटीवार यांनी इतर व्यक्तीला मतपत्रिका दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आपल्यावर झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत रवी राणा म्हणाले की, हनुमान चालीसेचे पुस्तक खिशात घेऊन जाणे, विधान भवनात जाणे हा गुन्हा आहे का? असा सवाल केला आहे.

दुसरीकडे, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विटरवरून, 'राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडी चा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू झाला आहे, आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!!' असे म्हणत भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news