पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माता लोकेश कनगराज सध्या सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत आपल्या चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटाचे टायटल 'थलाइवर 171' आहे. या चित्रपटाची घोषणा मागील वर्षी झाली होती. याआधी चित्रपटाच्या शूटिंग बद्दल अपडेट देण्यात आले होते. आता चित्रपटाच्या टीझरची वेळ समोर आली आहे. सुपरस्टार रजनीकांत यांची थलाइवर 171 नावाच्या चित्रपटात एक डार्क साईड पात्र असेल. हा चित्रपट लोकेश कनागराज आणि रजनीकांत यांच्यातील पहिला सहयोग आहे. मागील एका मुलाखतीत लोकेशने नमूद केले होते की तो थलायवर 171 मध्ये काहीतरी नवीन प्रयोग करणार आहे.
रजनीकांत यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. चित्रपटाच्या टायटल टीझरची वेळ आज संध्याकाळी ६ वाजता रिलीज होईल. तेलुगु सुपरस्टार नागार्जुन रजनीकांत यांच्यासोबत भूमिका करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
रिपोर्टनुसार, 'थलाइवर 171' चा अधिकृत प्रोमो व्हिडिओ २२ एप्रिल रोजी रिलीज होईल. हे देखील वृत्त समोर आले होते की, टायटल लॉन्चचे शूटिंग रजनीकांतसोबत आधीच संपुष्टात आले होते. सन पिक्चर्स अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत आहे. अनिरुद्ध रविचंदर चित्रपटाला संगीत देतील.
रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाची कहाणी 'थलाइवर 171' ड्रग्सच्या अवतीभवती फिरते. लोकेश चित्रपटात नवं काही तरी घेऊन येणार आहेत. याआधी 'थलाइवर 171' विषयी लोकेशने खुलासा केला होता की, चित्रपट अद्याप प्री प्रोडक्शनमध्ये आहे. शूटिंग सुरू होण्यास चार-पाच महिने लागतील.