पुणे: खोपी येथे आढळली हरणाची दोन पिले, राजगड वन विभागाला केली सुपूर्त

पुणे: खोपी येथे आढळली हरणाची दोन पिले, राजगड वन विभागाला केली सुपूर्त

खेड शिवापूर, पुढारी वृत्तसेवा: खोपी (ता. भोर) या गावच्या हद्दीत असलेल्या एका महाविद्यालयाच्या मागील रानामध्ये हरणाची दोन पिले आढळली. राजगड पोलिसांनी त्यांना वन विभागाच्या ताब्यात दिले. राजगड पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 22) रात्री दहा वाजेच्या सुमारास खोपी येथे हरणाची दोन लहान पाडसे सापडली असून, भटक्या कुर्त्यांपासून त्यांना धोका असल्याने सुरक्षित ठेवली आहेत. ही खबर मिळताच राजगड पोलिस ठाण्याचे हवालदार संतोष तोडकर यांनी वन विभागाला कळवून तत्काळ घटनास्थळी जाऊन हरणाची पाडसे वन विभागाच्या ताब्यात दिली. त्यामुळे हरणाच्या दोन्ही पाडसांना (पिलांना) जीवदान मिळाले आहे.

दरम्यान, वन विभागाचे वनरक्षक एन. एस. पगडे (शिंदेवाडी) व महिला वनरक्षक कांजळे उपस्थित होते. ते म्हणाले की, रात्री साडेदहा ते पहाटेपर्यंत त्या पाडसांना पुन्हा रानात ठेवून मादीची वाट पाहत होतो. मात्र, तेथे मादी आलीच नाही. ही पिले एका आठवड्याची असल्याने त्यांना दूध वगैरे देऊन सुरक्षिंतस्थळी ठेवले आहे. त्या पिनांबद्दलचा (पाडस) निर्णय वनपरिक्षेत्र अधिकारी संग्राम
जाधव घेतील, असे नवनाथ पगडे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news