Rajasthan vs Mumbai : मोक्याच्या क्षणी किशनचे अर्धशतक, मुंबईची विजयासह रनरेटमध्ये सुधारणा

Rajasthan vs Mumbai : मोक्याच्या क्षणी किशनचे अर्धशतक, मुंबईची विजयासह रनरेटमध्ये सुधारणा
Published on
Updated on

मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan vs Mumbai ) ८ विकेट आणि जवळपास १२ षटके राखून विजय मिळवला. याचबरोबर मुंबईने १२ गुणांसह गुणतालिकेत सातव्यावरुन पाचव्या स्थानावर झेप घेतली. विशेष म्हणजे मुंबईने आपल्या रनरेटमध्ये सुधारणा केली. आता मुंबईचे रनरेट -०.०४८ इतके आहे. गेल्या काही सामन्यापासून धावा करण्यात अपयश येणाऱ्या इशान किशनने संघात पुरनागमन करत २५ चेंडूत नाबाद ५० धावांची खेळी करत मुंबईला वेगवान विजय मिळून दिला.

राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्ससमोर ( Rajasthan vs Mumbai ) ठेवलेल्या ९१ धावांचे आव्हान पार करताना रोहित शर्माने आक्रमक सुरुवात केली. त्याने ११ चेंडूत २१ धावा केल्या. दुसऱ्या बाजूला इशान किशन अजूनही आपले खातेही उघडू शकला नव्हता. दरम्यान, संजू सॅमसनने रोहित शर्माला जीवनदानही दिले.

रोहितचा इरादा फसला ( Rajasthan vs Mumbai )

मात्र याचा आनंद फार काळ टिकला नाही. चेतन साकरियाने रोहितला २२ धावांवर बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला. रोहित बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने चौकार मारत आपल्या डावाची सुरुवात केली. दुसऱ्या बाजूने इशान किशनही धावांची गती वाढवत होता.

या दोघांनी पॉवर प्लेमध्ये मुंबईला पन्नास धावांच्या जवळ आणले. परंतु मुस्तफिजूरने सूर्यकुमार यादवला १३ धावांवर बाद केले. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या खेळपट्टीवर आला. मुंबई इंडियन्स सामना लवकरात लवकर संपवण्याच्या इराद्याने खेळत होता. पण, राजस्थानच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत मुंबईला मोठे फटके खेळण्यापासून रोखले.

सामना आठव्या षटकात गेल्यानंतर इशान किशनने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्याने ८.२ षटकात राजस्थानचे ९१ धावांचे टार्गेट पूर्ण केले. त्याने २५ चेंडूत नाबाद ५० धावा केल्या.

तत्पूर्वी, आयपीएल २०२१ मधील ५१ व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan vs Mumbai ) प्ले ऑफच्या अखेरच्या संधीसाठी भिडत आहेत. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली.

मुंबई इंडियन्सचे जोरदार कमबॅक ( Rajasthan vs Mumbai )

मात्र ३ चौकार मारून धडाक्यात सुरुवात करणाऱ्या यशस्वी जयस्वालला कुल्टर नाईलने १२ धावांवर बाद करत राजस्थालना पहिला धक्का दिला. त्यानंतर लुईसने धडाकेबाज फलंदाजी करत धावगती वाढवण्यास सुरुवात केली. मात्र अनुभवी बुमराने त्याला २४ धावांवर बाद करत राजस्थानला पॉवर प्लेमध्येच दुसरा धक्का दिला.

या दोन धक्यानंतर कर्णधार संजू सॅमसनवर डाव सावरण्याची जबाबदारी आली. मात्र निशामने त्याला ३ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे राजस्थानची अवस्था १ बाद ४१ वरुन ३ बाद ४१ अशी झाली. सॅमसन बाद झाल्यानंतर गेल्या सामन्यातील हिरो शिवम दुबे क्रिेजवर आला.

मात्र त्यालाही निशमने स्वस्तात माघारी धाडले. दुबे ३ धावा करुन बाद झाला. दुबेनंतर आलेल्या ग्लेन फिलिप्स आणि डेव्हिड मिलर यांनी १० व्या षटकात कसेबसे संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. पण, त्यानंतर कुल्टर नाईलने फिलिप्ससला ४ धावांवर बाद केले. यामुळे अवघ्या ५० धावांवर राजस्थान रॉयल्सचा निम्मा संघ माघारी गेला.

कुल्टर नाईल, निशमचा भेदक मारा( Rajasthan vs Mumbai )

निम्मा संघ माघारी गेल्यानंतर डेव्हिड मिलर आणि राहुल तेवातियाने डाव सारवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी १५ षटकात राजस्थानला सत्तरी पार करुन दिली. मात्र चांगला मारा करणाऱ्या निशमने तेवतियाला १२ धावांवर बाद करुन हो जोडी फोडली. त्यानंतर बुमराहने श्रेयस गोपालला भोपळाही फोडू दिला नाही.

अडचणीत सापडलेल्या राजस्थान रॉयल्सला कुल्टर नाईलने अजूनच अडचणीत आणले. त्याने १५ धावा करुन विकेटवर तर धरुन राहिलेल्या डेव्हिड मिलरला बाद करत राजस्थानला ७६ धावांवर आठवा धक्का दिला. कुल्टर नाईलने साकरियाला ६ धावांवर बाद करत आपला सहावा बळी टिपला. अखेर मुंबईने राजस्थानला २० षटकात ९ बाद ९० धावांवर रोखले.

मुंबईच्या संघात बदल, इशान किशन परतला (  Rajasthan vs Mumbai )

मुंबईने आपल्या संघात दोन बदल केले असून इशान किशन संघात परतला आहे. तो डिकॉकच्या जागी संघात आला. तर कृणाल पांड्याच्या जागी निशमचा समावेश करण्यात आला आहे.

राजस्थान रॉयल्सने देखली आपल्या संघात दोन बदल केले. श्रेयस गोपाल मयांक मार्कंडेयच्या जागी संघात आला. तर आकाश सिंगच्या जागी कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news