Rajasthan Assembly Legislative Result 2023: राजस्थानात सत्ता बदलाची परंपरा कायम; BJP सत्ता स्थापनेच्या वाटेवर

Rajasthan Assembly Result 2023
Rajasthan Assembly Result 2023

पुढारी ऑनलाईन डेस्क: राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजप मुसंडी मारताना दिसत आहे. तर सत्ताधारी काँग्रेस पिछाडीवर पडत आहे. निवडणुक आयोग आकडेवारीनुसार राजस्थानातील १९९ जागांपैकी भाजप ११६ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ६७ जागांसह पिछाडीवर आहे. भाजप निर्णायक आघाडीकडे वाटचाल करत आहे. यावरून भाजपला बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राजस्थानात भाजपच्या वसुंधरा राजेंचा करिश्मा चालला असून, येथील सत्ता बदलाची परंपरा कायम असल्याचे चित्र दिसत आहे. ( Rajasthan Legislative Assembly Result 2023)

प्रत्येक विधानसभा निवडणुकीत तिथले लोक सरकार बदलतात, अशी राजस्थानची परंपरा आहे. तिथे एकदा भाजपला सरकार स्थापन करण्याची संधी मिळते आणि दुसऱ्यांदा काँग्रेसला ही संधी मिळते. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत हा कल बदलून जनतेला आणखी एक संधी मिळेल, अशी आशा सत्ताधारी काँग्रेस पक्षाला होती, मात्र आतापर्यंतच्या ट्रेंडवरून भाजपला तिथे बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाला राजस्थानमधील जनतेने नाकारले असून, येथे काँग्रेस सरकारचा पुनरावृत्ती होणार नाही,असे चित्र स्पष्ट होत आहे. ( Rajasthan Legislative Assembly Result 2023)

'वसुंदरा' नाही, तर 'हा' असणार मुख्यमंत्रीपदाचा दावेदार

'इंडिया टुडे'च्या एक्झिट पोलनुसार अशोक गेहलोत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. या सर्व्हेनुसार ३० टक्के लोकांना गेहलोत यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा होती. तिजारा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बाबा बालकनाथ दुसऱ्या क्रमांकावर होते. सर्वेक्षणात १० टक्के लोकांनी त्यांना आपली पसंती दिली होती. आश्चर्याची बाब म्हणजे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या सर्वेक्षणात तिसऱ्या क्रमांकावर होत्या. ९ टक्के मतदारांनी त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली होती. बाबा बालकनाथ हे तिजारा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हे खासदार देखील आहेत. अशोक गेहलोत यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बालकनाथ हा दुसरा सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणून समोर आला आहे. या एक्झिट पोलनुसार भाजपच्या वसुंधरा राजे नाही तर बालकनाथ हे भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार असणार आहेत. याशिवाय गजेंद्र सिंह शेखावत आणि भूपेंद्र चौधरी या नेत्यांच्याही नावे चर्चेत आहेत.

Rajasthan Assembly Result 2023 : पराभवाला अंतर्गत कलह कारणीभूत

राजस्थान विधानसभेत निर्णायक कल समोर येत आहेत. यानुसार, भाजपला ११६ जागांसह निर्णायक आघाडी मिळताना दिसत आहे. पक्षातील अंतर्गत कलहाचा काँग्रेसला मोठा फटका बसताना दिसत आहे. २०१८ मध्ये गेहलोत मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा काँग्रेसचे सचिन पायलट यांच्याशी संघर्ष सुरूच होता. हा संघर्ष थांबवण्यासाठी काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला अनेकदा हस्तक्षेप करावा लागला. यातून राज्यातील जनतेत पक्ष आणि पक्षातील नेतृत्त्वाबद्दल नकारात्मक संदेश गेला. हे सरकार राज्यातील जनतेसाठी काम करण्याऐवजी आपापसातील वाद मिटवण्यातच सर्वाधिक वेळ घालवते, असे विशेषत: तरुणांना वाटत होते. दरम्यान काँग्रेस पक्षातील बंडाळी पाहता सचिन पायलट यांना शह देण्यासाठी मुख्यमंत्री गेहलोत यांनी भाजपच्या वसुंदरा राजे यांना मदत केल्याची चर्चा विधानसभेदरम्यान होती. या पार्श्वभूमीवर राजस्थानात पुन्हा वसुंदरा राजेच स्टार ठरणार असल्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news