जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार : राज ठाकरे

जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार : राज ठाकरे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. राज्यात आज गुढीपाडवा आणि नववर्ष उत्साहात साजरे केले जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आज २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभेत बोलत होते. महाराष्ट्रातील करोनाचे सर्व निर्बंध कमी झाल्यानंतर आज पहिल्यांदाच राज ठाकरेंनी सभा घेतली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  • १९९९ ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार, असं राज ठाकरे म्हणाले.
  • मुंबईच्या पोलिस आयुक्ताला हटवलं जातं, आयुक्त गृहमंत्र्यांवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले, गृहमंत्री जेलमध्ये जातो. पण तुम्ही सगळं विसरता, याचाच फायदा ते घेत आलेत," असं राज ठाकरे म्हणाले.
  • एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूये, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूये, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालाय, महाराष्ट्रात मराठी माणसाला नोकरीत प्राधान्य मिळायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले.
  • एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालाय. महाराष्ट्रात मराठी माणसाला नोकरीत प्राधान्य मिळायला हवं.
  • आमदारांना मुंबईत घरं द्या आणि त्यांची फार्महाऊस आपल्या नावावर करून घ्या. मनसेच्या आमदाराने सर्वात आधी त्यांना विरोध केला. आमदारांना मिळणाऱ्या पेंशनलाही त्यांनी विरोध केला. ते लोकांसाठी काम करत आहेत, उपकार करत नाही, तसेच मुख्यमंत्र्यांकडे घर कोणत्या आमदाराने मागितलं होतं, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
  • माझ्या कुटुंबावर येणार असेल तर मला अटक करा असं मुख्यमंत्री म्हणाले, मग पहिल्यांदा त्यांना सांगा की मुंबई महानगर पालिकेत ये जा करू नका… मला ईडीची नोटीस आली मी गेलो ना चौकशीला, अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं ना, मग भोगा. हे सगळं २०१९ चं आहे, या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका," असं आवाहन राज ठाकरेंनी जनतेला केलं.
  • प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा," असं राज ठाकरे म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news