Raj Kundra: ‘जेव्हा अपमान होईल तेव्हा..’ ९८ कोटींच्या संपत्ती जप्तीनंतर राज कुंद्राची पोस्ट चर्चेत

राज कुंद्रा
राज कुंद्रा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ईडीने शिल्पा शेट्टी, बिझनेसमन राज कुंद्राची ९७.७९ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यानंतर आता कुंद्रा यांची लेटेस्ट पोस्ट खूप व्हायरल होताना दिसत आहे. (Raj Kundra) गुरुवारी, ईडीने ही कारवाई केली होती. संपत्तीमध्ये राज कुंद्राची पत्नी, अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावावर असणारे मुंबई आणि पुण्याच्या फ्लॅटचा समावेश आहे. ईडीकडून ही कारवाई ६६०० कोटी रुपयांच्या बिटकॉईन पोंजी घोटाळा प्रकरणी घेण्यात आला आहे. आता संपत्ती जप्त केल्यानंतर राज कुंद्राची क्रिप्टिक नोट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (Raj Kundra)

राज कुंद्राने पोस्टमध्ये म्हटलंय-

९८ कोटी रुपयांची संपत्ती जप्त झाल्यानंतर राज कुंद्राने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर डरकाळी फोडताना एका सिंहाचा फोटो शेअर केली आहे, त्यावर लिहिलंय, 'जेव्हा तुम्हाला अपमानित झाल्याचे अनुभव होईल, तेव्हा शांत राहणे शिकणे एक वेगळ्या प्रकारचा विकास आहे.' दरम्यान, शिल्पा शेट्टीने आतापर्यंत ईडीच्या कारवाईवर सार्वजनिकपणे कोणतेही विधान केलेले नाही.

राज कुंद्राशिवाय त्याची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेदेखील एक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये साई बाबांचा फोटो दिसतो आहे. ही पोस्ट आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यासोबत लिहिलं- 'सरेंडर..ओम साई राम'

याआधी शिल्पा आणि राज कुंद्रा यांचे वकील प्रशांत पाटील यांनी एक स्टेटमेंट जारी करत म्हटले होते की, तो अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी एकदम तयार आहेत. त्यांना आपल्या न्यापालिकेवर पूर्ण विश्वास आहे.

हे प्रकरण बिटकॉईन स्कॅमशी संबंधित आहे. यामध्ये राज कुंद्रावर आरोप आहे की, त्यांनी गुंतवणूकदारांच्या पैशांबाबत फसवणूक केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news