पुणे : पुढारी वृत्तसेवा; राज्यात पावसाचे धूमशान (Rain Updates) सुरूच आहे. 12 सप्टेंबरपर्यंत कोकणात अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांत मेघगर्जना, वादळी वारे तसेच विजांच्या कडकडाटात पाऊस हजेरी लावणार आहे.
दरम्यान, 12 सप्टेंबरपर्यंत कोल्हापुरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे या जिल्ह्यांत 'ऑरेज अलर्ट' जारी केला आहे. या जिल्ह्यांत 10 आणि 11 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस बरसणार आहे. (Rain Updates)
हे ही वाचा :