Rain Update: कोल्हापुरात 20 पर्यंत पावसाचा जोर

Rain Update: कोल्हापुरात 20 पर्यंत पावसाचा जोर
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर; तसेच कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी या भागासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.

दरम्यान, शुक्रवारी पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाने अगदी सकाळपासूनच हजेरी लावली. संततधार पावसामुळे कमाल आणि किमान तापमान कमी झाल्याने वातावरणात थंडी जाणवत होती. 20 सप्टेंबरपर्यंत विदर्भात विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा या भागात आगामी दोन दिवस घाटमाथ्यावर मुसळधार, कोकणातील पालघर, रायगड या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news