शहागड (जालना) : अंबड तालुक्यातील शहागड परिसरात बुधवारी रात्री-पहाटे गुरुवारी दुपारी असा सलग दोन दिवसांपासून पाऊस चालू आहे. शहागड-गोरी-गंधारी,डोमलगाव, महाकाळा, पाथरवाला-कुरण, गोंदी आदी गोदावरी पट्ट्यात पाऊस झालेला असून महिनाभरापासून पावसाने खंड दिला होता. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले होते. उसापासून होत असल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळालेली असून, मोठ्या प्रमाणात कपाशी, सोयाबीन, ऊस, मोसंबी, तुर, शेतकऱ्यांनी लावलेली असून यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या हंगामात खर्च केलेला आहे. पावसाने खंड दिल्याने कपाशीची वाढ होती. तसेच रोगाचाही प्रादुर्भाव पडत होता. समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.