Rail travel : रेल्‍वे प्रवास महागला, १३० गाड्यांच्‍या तिकीट दरात वाढ

Rail travel : रेल्‍वे प्रवास महागला, १३० गाड्यांच्‍या तिकीट दरात वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशभरातील १३० मेल-एक्‍सप्रेस गाड्यांना सुपरफास्‍टचा दर्जा देण्‍यात आल्‍याने या गाड्यांच्‍या तिकिट दरात भारतीय रेल्‍वेने वाढ केली आहे. वातानुकूल १ आणि एक्झिक्युटिव्ह क्लासच्या गाड्यांच्या प्रवाशी भाड्यामध्ये वाढ करण्‍यात आली आहे. वातानुकूल १ रेल्‍वे प्रवासासाठी ७५ रुपे, वातानुकूल२-3 चेअरक कारमध्‍ये ४५ रुपये तर स्‍लीपर क्‍लासाठी ३० रुपये भाडेवाढ करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे आता पीएनआर (सहा प्रवाशांसाठी ) रेल्‍वे तिकीट बुकिंग करताना अतिरिक्‍त पैसे मोजावे लागणार आहेत. ही भाडेवाढ १ ऑक्‍टोबरपासून लागू करण्‍यात आली आहे. ( Rail travel )

भारतीय रेल्‍वेने सरासरी ताशी ५६ किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणार्‍यांना गाड्यांना सुपरफास्‍टचा दर्जा दिला आहे. त्‍यामध्‍ये देशभरातील १३० मेल-एक्‍सप्रेस गाड्यांना सुपरफास्‍टचा दर्जा दिला आहे. त्‍यामुळे यातून एसी-1 मध्ये 450 रुपये, एसी-2 मध्ये 270 रुपये, 3 आणि स्लीपर कोचमध्ये (sleeper coach) 180 रुपये अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत. या सर्व गाड्यांमधील खाणे, सुरक्षा आणि सुविधांच्‍या किंमतीमध्‍ये वाढ झालेली नाही.

तज्‍ज्ञांच्‍या मतानुसार, भारतीय रेल्‍वे मागील ४५ वर्षांपासून रेल्‍वे गाड्यांचा वेग वाढविण्‍यात अपयशी ठरली आहे. मागील चाळीस वर्षांहून अधिक काळ मेल-एक्‍प्रेस गाड्यांच्‍या सरासरी प्रतिताशी वेग हा ५० ते ५८ किलोमीटर इतका आहे. तर प्रीमियम राजधानी, शताब्दी, दुरांतो इत्यादी गाड्यांची सरासरी वेग 70-85 किमी प्रतितास आहे. 15-20 टक्केच ट्रेन कधीच त्यांच्या स्थानावर वेळेवर पोहोचत नाहीत. या गाड्या 15-20 मिनिटे उशिराने पोहोचतात.

2022-23च्या नवीन रेल्वे वेळापत्रकामध्ये, मोठ्या संख्येने पॅसेंजर गाड्यांना मेल-एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे या गाड्यांमधून लाखो प्रवासी प्रवास करू शकणार नाहीत, कारण रेल्वेची झालेली भाडेवाढ. विना तिकीट प्रवास केल्यास भाडे आणि दंड दोन्ही आकारले जातील. याशिवाय मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये मूळ भाड्याव्यतिरिक्त आरक्षण शुल्क, सुपरफास्ट चार्जसह जीएसटी आकारला जातो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news