रायगड : गणेशोत्‍सवासाठी मध्य व पश्चिम रेल्वेकडून ३१२ विशेष फेऱ्या

file photo
file photo

रोहे; महादेव सरसंबे कोकणवासीयांच्या सेवेसाठी मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे सज्ज झाले असून, यावर्षी गेल्या वर्षापेक्षा जास्त गाड्या पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वेच्यावतीने कोकणासाठी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकणवासीयांचा गणपती उत्सवासाठी गावाकडे जाण्याचा रेल्वे प्रवास सुखकारक होणार आहे.

गणेशोत्‍सवासाठी कोकणवासीयांच्या सोडण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये सीएसएमटी सावंतवाडी, सीएसएमटी मडगाव, एल टी टी कुडाळ, पुणे करमाळी कुडाळ पुणे, दिवा रत्नागिरी, पनवेल कुडाळ करमाळी, पनवेल, एलटीटी कुडाळ, नागपूर मडगाव, एलटीटी मंगळूर, दिवा चिपळूण आदीसह अन्य गाड्यांचा समावेश आहे.

गणेशोत्सवासाठी मध्य व पश्चिम रेल्वे द्वारे एकूण ३१२ विशेष फेऱ्या- (२०२२ च्या २९४ फेऱ्यापेक्षा १८ फेऱ्या जास्त). ३१२ पैकी मध्य रेल्वेच्या २४४ फेऱ्या यामध्ये- १५० आरक्षित फेऱ्या ९४ अनारक्षित फेऱ्या. (२०२२ च्या ३२ अनारक्षित फेऱ्या पेक्षा ६२ अनारक्षित फेऱ्या जास्त)

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news