Karnataka Election Result 2023 | कर्नाटक में मोहब्बत की दुकान खुली है; कर्नाटक निकालावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

संग्रहित फोट
संग्रहित फोट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Election Result 2023) काँग्रेसने निर्णायक बहुमताकडे वाटचाल सुरु ठेवली आहे. कॉंग्रेसला १३६ जागा मिळण्याची शक्यता आहे. या दणदणीत विजयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. 'कर्नाटक में नफरत की बाजार बंद हुई है, मोहब्बत की दुकान खुली है', अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पक्षाच्या विजयावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Election Result 2023) स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी दुपारी काँग्रेस मुख्यालयात पोहचले.यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना त्यांनी कर्नाटकवासिय तसेच सर्व नेते, कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.गरीबांच्या शक्तीने भाजपला पराभूत केले आहे. कॉंग्रेस सदैव गरीबांसोबत राहीली आहे. आम्ही द्वेषाने निवडणूक लढवली नाही. आता कर्नाटक मध्ये द्वेषाचे दुकान बंद झाले आहे आणि प्रेमाचा बाजार खुला झाला आहे,अशी भावना राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली.

विधानसभा निवडणुकीत जाहिरनाम्यातून देण्यात आलेली ५ हमींची पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच पुर्तता केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.कर्नाटक निवडणुकीत एका बाजूला सरकारचे निवटवर्तीय असलेले भांडवलदारांची ताकद पणाला लागली होती, तर दुसरीकडे गरीब जनतेची शक्ती होती.या निवडणुकीत शक्तीने ताकदेला पराभूत केले आहे. आता हेच प्रत्येक राज्यात होईल.कॉंग्रेस कर्नाटकमध्ये गरीबांसोबत उभी राहीली.द्वेष आणि चुकींच्या शब्दांवर नाही तर मुद्दयांवर निवडणूक लढवली. ही निवडणूक आम्ही प्रेमाने लढवली. देशासाठी प्रेमभाव महत्वाचा असल्याचे कर्नाटकने दाखवून दिल्याचे राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना माध्‍यमांशी बोलताना अश्रू अनावर झाले. यावेळी ते म्‍हणाले,"पक्षाने माझ्‍यावर प्रचंड विश्‍वास दाखवला या विजयाचे सर्व श्रेय मी राज्‍यातील काँग्रेस कार्यकत्यार्त्यांना देतो. त्‍यांनी अपार कष्‍ट केले त्‍यामुळे राज्‍यात खोटेपणाचा पर्दाफाश झाला."

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news