बाह्यग्रहावरून पृथ्वीवर येताहेत रेडिओ सिग्नल

बाह्यग्रहावरून पृथ्वीवर येताहेत रेडिओ सिग्नल

न्यूयॉर्क : पृथ्वीच्या आकाराच्या एका बाह्यग्रहापासून येणार्‍या रेडिओ सिग्नलचा शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे. हे रेडिओ सिग्नल सातत्याने येत आहेत. यामुळे खगोलशास्त्रांना तेथे जीवन असण्याची शक्यता वाटत आहे. याचे कारण म्हणजे या बाह्यग्रहावर असलेले चुंबकीय क्षेत्र होय.

पृथ्वीवर रेडिओ सिग्नल पाठवत असलेल्या बाह्यग्रहाचे नाव 'वायझेड सेटी बी' असे आहे. तो आपल्या पृथ्वीपासून 12 प्रकाश वर्षे दूर अंतरावर असून, आपल्या लहानशा तार्‍याभोवती फिरत आहे. यूएस नॅशनल सायन्स फाऊंडेशनच्या नॅशनल रेडिओ एस्ट्रोनॉमी ऑब्जर्व्हेटरीचे प्रोग्राम डायरेक्टर जो पेस यांनी सांगितले की, दुसर्‍या सूर्यमालेत जीवनाची संभावना आहे की नाही? हे त्या बाह्यग्रहावर चुंबकीय क्षेत्र आहे की नाही, यावरच अवलंबून असते.

'वायझेड सेटी बी' या खडकाळ बाह्यग्रहावर चुंबकीय क्षेत्र असण्याची शक्यता आहे. असे असेल तर तेथे भरपूर काही शोधले जाऊ शकते. मॅग्नेटिक फिल्ड हे असे असते की, कोणत्याही ग्रहावरील वातावरणाला शक्तिशाली स्टेलर वार्‍यांमुळे खराब होऊ देत नाही. जसे की मंगळावरही एकेकाळी वातावरण होते. हा एक उष्ण आणि ओलावा असलेला ग्रह होता; पण याच लालग्रहाने आपले चुंबकीय क्षेत्र गमावले आणि तेथील वातावरण हळूहळू नष्ट होत गेले.

आपल्या सूर्यमालेतील गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांवर आजही चुंबकीय क्षेत्र आहे. दरम्यान, खगोल शास्त्रज्ञांना आजपर्यंत असे अनेक बाह्यग्रह सापडले आहेत की, त्यांचे स्वत:चे चुंबकीय क्षेत्र आहे. मात्र, यापूर्वी खडकाळ आणि आकाराने लहान असलेल्या बाह्यग्रहांवर चुंबकीय क्षेत्र आढळले नव्हते. मात्र, 'वायझेड सेटी बी' या बाह्यग्रहावर ते असल्याची शक्यता आहे. यामुळेच तेथून रेडिओ सिग्नल पृथ्वीवर येत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news