70-hours Work Week Remark | ‘आठवड्यातून ७० तास काम’ मुद्यावर राधिका गुप्ता यांची पोस्ट व्हायरल, ‘भारतीय महिला…’

70-hours Work Week Remark | ‘आठवड्यातून ७० तास काम’ मुद्यावर राधिका गुप्ता यांची पोस्ट व्हायरल, ‘भारतीय महिला…’

पुढारी ऑनलाईन : देशाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करायला हवे, असा सल्ला इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Infosys founder Narayana Murthy) यांनी दिला होता. त्यांच्या या विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. नारायण मूर्ती यांच्या मताशी काहींनी सहमती दर्शवली आहे तर काहींनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Narayana Murthy's 70-hours Work Week Remark)

संबंधित बातम्या 

दरम्यान, रविवारी एडलवाईस एमएफच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि सीईओ राधिका गुप्ता ( Edelweiss MF's MD and CEO Radhika Gupta) यांनी या मुद्द्यावर मत व्यक्त केले. त्यांनी म्हटले आहे की अनेक भारतीय महिला भारत आणि पुढील पिढी घडवण्यासाठी आठवड्यातून ७० तासांपेक्षा जास्त वेळ काम करत आहेत. त्यांनी त्यांचे हे मत X (आधीचे ट्विटर) वर एक पोस्ट करत व्यक्त केले आहे. ही त्यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

"ऑफिस आणि घरांदरम्यान अनेक भारतीय महिला भारत (आपल्या कामाद्वारे) आणि भारतीयांची पुढची पिढी (आमची मुले) घडविण्यासाठी आठवड्यातून ७० तासांहून अधिक काम करत आहेत. हे काम त्यांचे अनेक वर्षे आणि दशके चाललेले आहे. त्या हसतमुखाने आणि ओव्हरटाइमची मागणी न करता त्या आपले काम करत आहेत. गंमतीची गोष्ट म्हणजे, यावर सोशल मीडियावर आमच्याबद्दल कोणीही वादविवाद केलेला नाही," असे त्यांनी म्हटले आहे.

त्यांच्या पोस्टवर शेकडो कमेंट्स आल्या आहेत. एका यूजर्सने लिहिले आहे की, "भारतीय महिलांच्या समर्पित कष्टाला तोड नाही. त्यांच्या मेहनतीची दखल घ्यावीच लागेल. दुसर्‍या एका यूजर्सने टिप्पणी केली आहे की, "मी तुमच्या मताशी सहमत आहे. मी अशाच एका कष्टाळू महिलेशे लग्न केले आहे. आम्हाला मुलगा झाल्यापासून गेली १८ वर्षाहून अधिक काळ ती हे सर्व काही सांभाळत आहे. कामाच्या ठिकाणी एक उत्कृष्ट कर्मचारी आणि प्रत्येक गोष्टीत सर्वोत्कृष्ट, तरीही काहीवेळा तिच्यावर याचा परिणाम होतो. पण ती खंबीरपणे सांभाळून घेते आणि पुन्हा कामाला लागते. मी भाग्यवान आहे."

"खरं तर माझ्या पतीनेही आमच्या मुलाचे पालनपोषण करण्यासाठी खूप काही केले. घरी मी एकटीच नव्हते. तसेच मुंबईतील काम हे जास्त तासांचे असते; आम्हा सर्वांना कामाला जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो," असे तिसऱ्या एका यूजर्सने म्हटले आहे.

महिलांना घरातील कामातून वीकेंडला सुट्टी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी कोणताही डाउनटाइम अथवा त्यांना स्वत: ची काळजी घेण्यासाठी वेळ नसतो. (Narayana Murthy's 70-hours Work Week Remark)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news