आर बाल्कीचा ‘घूमर’ मेलबर्नच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत

R. Balki
R. Balki

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांना प्रभावित करण्यासाठी आर बाल्कीची " घूमर " या चित्रपटाची निवड झालीय. हा एक सिनेमॅटिक चित्रपटाचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे. आर बाल्की यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'घूमर' प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झालाय. लवकरच १४ व्या भारतीय चित्रपट महोत्सव ऑफ मेलबर्न (IFFM) मध्ये सुरुवातीचा चित्रपट म्हणून प्रदर्शित होणार आहे. अभिषेक बच्चन यांच्या नेतृत्वाखाली घडलेला हा अविस्मरणीय हे सिनेमॅटिक अनुभव असून नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडून जाणार आहे.

आर बाल्की हे त्यांच्या अनोख्या दृष्टी असलेल्या दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. ' चीनी कम', 'पा' आणि 'पॅड मॅन' यासह अनेक समीक्षकांनी प्रशंसित चित्रपटांसह दिग्दर्शक बाल्की यांनी आणले. आर बाल्की म्हणतात " घूमर हा IFFM मधील ओपनिंग चित्रपट असेल ही आमच्यासाठी खरोखरच सन्मानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. घूमर हा खेळा वर आधारित चित्रपट असणार आहे."

अभिनेता अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्यासह त्याच्या वेगळ्या दिग्दर्शन शैली आणि उत्कृष्ट कलाकारांसह " घूमर" या चित्रपट महोत्सवावर अमिट छाप सोडणार यात शंका नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news