पुढारी ऑनलाईन डेस्क : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २ द रूल' चा टीजर काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या ६८ सेकंदाच्या टीजरमध्ये एकच सीक्वेंस दिसत होते. आणि अल्लू अर्जुनचा एकच गेटअप दिसला. पण, त्याचा हा एक गेटअप इतका पॉवरफुल होता की, लोक सातत्य़ाने 'पुष्पा २' चा टीजर पाहू लागले.
टीजरमध्ये अल्लू अर्जुनचा हा गेटअप एका धार्मिक उत्सवाशी जोडला गेला आहे, त्यास 'तिरुपति गंगम्मा जतारा' म्हटलं जातं. या उत्सवामागे महिलांच्या सन्मानाशी संबंधित एक खूप जुनी कहाणी आहे, जी एक शक्तिशाली देवीशी संबंधित आहे. आता अशी माहिती समोर आली आहे की, एका सीक्वेंससाठी निर्मात्यांनी खूप मोठी रक्कम खर्च केली आहे.
लोककथा आणि मिथकनुसार, श्री तातैयागुंटा गंगम्माला तिरुपती शहराची ग्रामदेवी मानली जाते. अनेक कथांमध्ये तिला भगवान वेंकटेश्वर स्वामीची बहिणदेखील म्हटले जाते. असे म्हटले जाते की, अनेक शतकांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा तिरुपती आणि आसपासच्या क्षेत्रांवर पलेगोंडुलुची सत्ता होती, तेव्हा महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत होत्या.
महिलांवर शोषण, अत्याचार आणि जीवघेणा हल्ले व्हायचे. त्यावेळी देवी गंगम्माने अविलाला नावाच्या एका गावात जन्म घेतला. मोठी होऊन ती एक खूप सुंदर महिला बनली.
असे म्हटले जाते की, पलेगोंडुलु घाबरून पळाला आणि लपून बसला. त्याला बाहेर काढण्यासाठी गंगम्माने एक 'गंगा जतारा' प्लॅन केला. धार्मिक यात्रांमध्ये खूप ठिकाणी लोक 'जात्रा, जतरा वा जतारा' म्हणतात. यामध्ये आठवडाभर लोकांना विचित्र पोषाख बनवायचे असतात. सातव्या दिवशी जेव्हा पलेगोंडुलु बाहेर आला, तेव्हा गंगम्माने त्याचा वध केला. या घटनेची आठवण म्हणून देवी गंगम्माच्या प्रती श्रद्धा दाखवण्यासाठी आज देखील हा उत्सव साजरा केला जातो.
या उत्सवात पुरुष हे महिलांच्या वेषात तयार होतात. साडी नेसतात, श्रृंगार करतात, ज्वेलरी घालता आणि विगदेखील लावतात. याप्रकारे ते देवी गंगम्मा आणि नारीत्वच्या प्रती आपली श्रद्धा व्यक्त करतात. जताराच्या सातव्या दिनी वेगवेगळ्या वेशात लोक तयार होतात, त्याचे अनेक नियम आहेत. रिपोर्ट्सनुसार, 'पुष्पा २' च्या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुन ज्या गेटअपमध्ये आहे, तो जताराच्या पाचव्या दिवसाचा 'मातंगी वेशम' आहे.