Punjab Kings : पंजाब किंग्जच्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा होताच प्रिती झिंटाची खुलली खळी!

Punjab Kings : पंजाब किंग्जच्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा होताच प्रिती झिंटाची खुलली खळी!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी पंजाब किंग्जला (Punjab Kings) नवा मुख्य प्रशिक्षक मिळाला आहे. भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे आता पंजाब किंग्जचा प्रशिक्षक असणार नाही याच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. इंग्लंड संघाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या ट्रेव्हर बायलिसकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ५९ वर्षीय बायलिस याआधी सनरायझर्स हैदराबाद (SRH) चे मुख्य प्रशिक्षक होते.

ट्रेव्हर बायलिस २०१९ वर्ल्डकप जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचे प्रशिक्षक (Punjab Kings)

२०१९ मध्ये ट्रेव्हर बायलिस प्रशिक्षक असताना इंग्लंड संघाने प्रथमच वनडे मध्ये विश्वचषक जिंकला आहे. २०१२ आणि २०१४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयपीएल विजेतेपद पटकावले होते. बिग बॅश लीग (BBL) च्या पहिल्या सत्रात सिडनी सिक्सर्सला विजेतेपदापर्यंत नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. बायलिसने शेफिल्ड शिल्डमध्ये न्यू साउथ वेल्सचे प्रशिक्षकही केले आहेत. बायलिस यांच्याकडे एक वर्ल्डकप, २ आयपीएल विजेतेपद आणि बिग बॅश लीगचे टायटल असा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे.

अनिल कुंबळे यांचा करार न वाढवण्याचा निर्णय

कुंबळे यांना अपेक्षित निकाल देता न आल्यामुळे फ्रँचायझीने त्यांचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू केला होता. कुंबळे यांच्या काळात पंजाब किंग्ज २०२० आणि २०२१ दोन्ही वेळा पाचव्या स्थानावर राहिली. लीगमध्ये एकूण आठ संघांचा समावेश होता. तसेच २०२२ मध्ये एकूण दहा संघ मैदानात उतरले होते. तेव्हा पंजाब किंग्स संघ सहाव्या स्थानावर होता. आता बायलिस यांच्या नियुक्तीमुळे पंजाब किंग्जला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

पंजाबचा संघ दोनदा प्लेऑफमध्ये (Punjab Kings)

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाच्या मालकीचा पंजाब संघ आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून खेळत आहे. हा संघ पूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब म्हणून ओळखला जात होता. पंजाब किंग्जने २०१४ च्या अंतिम सामन्यासह केवळ दोनदाच प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आहे.

२०२२ च्या आयपीएल लिलावात पंजाबने लियाम लिव्हिंगस्टोन, कागिसो रबाडा, शिखर धवन या खेळाडूंना खरेदी केले होते. तसेच, लिलावापूर्वी पंजाब किंग्जने मयंक अग्रवाल आणि अर्शदीप सिंग यांना कायम ठेवले.

मयंकला कर्णधारपदावरून हटवल्याची चर्चा

मयंक अग्रवालने आयपीएल २०२२ मध्ये १६.३३ च्या सरासरीने आणि १२२.५ च्या स्ट्राईक रेटने फक्त १९६ धावा केल्या. ही कामगिरी त्याच्या मागील तीन आयपीएलमधील कामगिरीच्या अगदी सुमार होती. २०१९ मध्ये मयंकने १४१.८८ च्या स्ट्राइक रेटने ३३२ धावा केल्या होत्या. मयंक अग्रवालला त्याच्या सुमार कामगिरीमुळे पंजाब किंग्जच्या कर्णधारपदावरून हटवण्याची चर्चा होती. मात्र, पंजाब किंग्जने ते नाकारले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news