पुणे : तुरूंगातील दोन गजाच्या गॅपमधून बाहेर पडून चोरट्यांची धूम

पुणे : तुरूंगातील दोन गजाच्या गॅपमधून बाहेर पडून चोरट्यांची धूम
Published on
Updated on

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा : तुरूंगातून बाहेर पडण्याच्या अनेक क्लृप्त्या कैद्यांकडून केल्या जातात. पण एका चोरट्याने पळून जाण्यासाठी वापरलेली पद्धत पाहून पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला . घरफोडी प्रकरणात अटक केलेला चोरटा तुरूंगातील दोन गजातील छोट्या जागेतून अंग चोरून बाहेर पडला. आणि त्यांने धूम ठोकली. ही घटना चाकण येथे घडली आहे. या प्रकारामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.

कुणाल बाळू वीर असे आरोपीचे नाव आहे. त्याला घरफोडी प्रकरणी अटक करण्यात आली होती. दरम्यान, त्यांने दोन गजातून बाहेर पडत धूम ठोकली. आरोपी पळून गेल्याचे समजताच चाकण पोलिसांनी त्याचा शोध घेऊन दोन तासांत पुन्हा त्याला जेरबंद केले. त्याला पुन्हा तुरूंगात आणल्यानंतर तो कसा पळून गेला. याचे प्रात्यक्षिक त्याच्याकडून पोलिसांनी करून घेतले. ते पाहून पोलीस चक्रावून गेले. त्यामुळे जेलच्या दोन गजातील अंतर जास्त असल्याने तो पळून गेल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे दोन गजातील अंतर कमी करण्यावर पोलिसांना विचार करावा लागणार आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : 'झुंड' मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news