पुणे, पुढारी ऑनलाईन : शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. राजू साळुंखे यांना जम्बो कोविड सेंटरच्या गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबाबत भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटर वरुन दिली माहिती दिली आहे.
खासदार संजय राऊत यांचे भागीदार सुजित पाटकर यांना अटक करा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. या प्रकरणातील तीन आरोपी हे अद्याप फरार असून त्यांना अटक करा अशी सोमय्या यांनी मागणी केली आहे. राजू साळुंखे हे सुजित पाटकर हे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात राजू साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुजित पाटकर आणि लाईफ लाईन कंपनीविरुद्ध मुंबई पोलिसांनी या आधीच गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये कोरोना काळात गैरव्यवहार झाला. या कोविड सेंटरचे काम अस्तित्वात नसलेल्या लाइफ लाइन कंपनीला दिले. या दरम्यान अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असं ही किरीट सोमय्या. म्हणाले