पुणे, संभाजीनगर, गोंदियात पारा आला 14.4 अंशांवर

पुणे, संभाजीनगर, गोंदियात पारा आला 14.4 अंशांवर
Published on
Updated on

पुणे : पुणे, छत्रपती संभाजीनगर व गोंदिया शहराच्या किमान तापमानात साडेतीन ते चार अंशांनी घट होऊन पारा 14.4 अंशांवर खाली आला. शुक्रवारी राज्यातील सर्वांत कमी तापमान या तीन शहरांत होते. राज्यातील हवामान शुष्क आणि कोरडे झाल्याने थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी जळगावचे किमान तापमान 18 वरून 11 अंशावर खाली आले होते. त्यापाठोपाठ शुक्रवारी पुणे शहराचे किमान तापमान 17.5 वरून 14.4 अंशांवर, तर गोंदियाचे तापमानही 18 वरून 14.4 अंशांवर खाली आले होते. राज्यातील बहुतांश शहरांच्या किमान तापमानात शुक्रवारी 3 ते 6 अंशांनी घट झाली.

शुक्रवारचे राज्याचे किमान तापमान

पुणे 14.4, छत्रपती संभाजीनगर 14.4, गोंदिया 14.4 नाशिक 15, महाबळेश्वर 15.6, नाशिक व परभणी 16.5, सातारा 16.5, सांगली 18.1, सोलापूर 16.5, नांदेड 18.2, अकोला 17, अमरावती 16, चंद्रपूर 16.4.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news