पुणे : कोयता गॅंगला चाप बसवण्यासाठी कोयते विक्रेत्यावर छापा, बोहारी आळीतील दुकानदाराकडून 105 कोयते जप्त

पुणे : कोयता गॅंगला चाप बसवण्यासाठी कोयते विक्रेत्यावर छापा, बोहारी आळीतील दुकानदाराकडून 105 कोयते जप्त
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयत्याचा वापर करुन दहशत माजविण्याऱ्या गुंडांनी धुमाकुळ घातला आहे. यामुळे आता पोलिसांनी कोयते विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील बोहरी आळीतील एका दुकानावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून दुकानात विक्रीसाठी ठेवलेले 105 कोयते जप्त केले आहेत.

पुण्यात आपल्या भागात भाईगिरी करण्यासाठी अनेक अल्पवयीन मुले, तरुण कोयत्याचा वापर करुन दहशत निर्माण करीत आहेत. तसेच भर रस्त्यावर आणि गर्दीच्या वेळी कोयत्याने येणाऱ्या जाणाऱ्या वार करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. दुकानदारांना आणि विक्रेत्यांना कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागले आहेत. या घडलेल्या सर्व गुन्ह्यांमध्ये कोयत्याचा वापर करण्यात आला आहे.

नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत पुण्यातील कोयत्या गँगचा विषय उपस्थित केला होता. त्यानंतर पोलिसांनी या गुन्हेगारांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. त्यानंतर पोलिसांनी शहरातील मध्यभागात असणाऱ्या बोहरी आळीतील कोयते विक्री करणाऱ्या दुकानांवर छापा टाकून 105 कोयते जप्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news