पुणे : बोपदेव घाटाजवळ पीएमपी बसचा अपघात, १५ प्रवासी जखमी

पुणे : बोपदेव घाटाजवळ पीएमपी बसचा अपघात, १५ प्रवासी जखमी

पुणे, पुढारी वृत्तसेवा : पुण्याहून सासवडच्या दिशेने जाणार्‍या पीएमपीच्या बसला बोपदेव घाटाजवळ अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस गाडी थेट रस्त्याशेजारी असलेल्या शेतामध्ये घुसली. यामध्ये १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. कात्रज आगारातून रविवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास प्रवाशांना घेऊन पीएमपी बस सासवडच्या दिशेने जात होती. यावेळी बोपदेव घाट उतरल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि प्रवाशांसह बस रस्त्याशेजारील शेतात घुसली. यावेळी बसमध्ये २० ते ३० प्रवासी होते. त्यापैकी १५

प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असून, सुदैवाने मोठा अपघात टळला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्र्यय झेंडे यांनी घटनास्थळी जात अपघात झालेल्या बसची पहाणी केली. यासंदर्भात ते म्हणाले, बोपदेव घाट उतरल्यावर गराडे गावाजवळ या बसला आल्यावर अपघात झाला आहे. या बसमधील १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना तात्काळ जवळील रूग्णालयात नेण्यात आले आहे. तर उर्वरित प्रवाशांसाठी दुसर्‍या बसची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news