तत्पर पासपोर्ट देण्यात पुणे विभाग सुसाट ! तीन महिन्यात 40 हजार पारपत्र वितरित

तत्पर पासपोर्ट देण्यात पुणे विभाग सुसाट ! तीन महिन्यात 40 हजार पारपत्र वितरित

Published on

दिनेश गुप्ता

पुणे : बंगळुरूनंतर आयटी क्षेत्रात पुण्याला आलेले महत्त्व अन् परदेशात मिळणार्‍या संधीचे सोने करण्यासाठी पुणे पासपोर्ट कार्यालयात तरुण गर्दी करीत आहेत. त्यात केंद्राने चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रात दिलेल्या सवलतीचा फायदा घेत पुण्यातील बहुतांश तरुण-तरुणी पैसा कमाविण्यासाठी विदेशाला पसंती देत आहेत. याच कारणावरून सर्वांत मोठ्या संख्येने पासपोर्ट देणारे म्हणून पुणे शहराची आता ओळख निर्माण झाली आहे.

उच्च शिक्षणाचा फायदा घेऊन पैसा कमावण्यासाठी तरुण विदेशाला पसंती देत आहे. यासाठी वेळप्रसंगी कुटुंबीयांशी विरोध पत्करून अनेक तरुण विदेशी कंपन्यांशी करारबद्ध होत आहे. व्हिसा मिळण्यासाठी विदेशी कंपन्याबरोबर अनेक देशही सवलतींचा वर्षाव करत आहेत. आयटी क्षेत्रात अनुभव घेतल्यानंतर विदेशी कंपन्यात संधी मिळविण्यासाठी अनेक राज्यांतील तरुण-तरुणी पुण्यात येतात. येथील वास्तव्याचा आधार घेत बहुतांश तरुण पासपोर्ट कार्यालयात कमी काळात ते काढून घेत आहेत. केंद्रानेही पासपोर्ट काढण्यातील प्रक्रिया सोप्या केल्याने पासपोर्ट काढणार्‍यांची संख्या वाढली आहे.

2020 व 2021 मध्ये कोविडच्या निर्बंधामुळे अनेकांना परदेशात प्रवास करता आला नाही. परिणामी, पासपोर्टची नूतनीकरणदेखील करता आले नाही. नियम शिथिल झाल्यानंतर आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रवासाचेही निर्बंध शिथिल करण्यात आले. पुणे विभाग आयटी आणि बिझनेस हाफ पैकी एक असल्याने मागील दोन वर्षांत पासपोर्ट मागणार्‍यांची संख्या अधिक वाढली आहे.

चारित्र्य पडताळणी (पोलिस क्लीअरन्स सर्टिफिकेट) झाली सोपी
परदेशी निवासी स्थिती, रोजगार, दीर्घकालीन व्हिसा किंवा इमिग्रेशनसाठी पोलिस क्लीअरन्स सर्टिफिकेट (पीसीसी) आवश्यक असते. पूर्वी या सर्टिफिकेटसाठी सेवा फक्त पुणे आणि सोलापूर येथील पासपोर्ट केंद्रात होती. सप्टेंबर 2022 पासून विभागांतर्गत इतर जिल्ह्यांतील अर्जदारांना ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये पीसीसी भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुण्याच्या अंतर्गत अहमदनगर, बीड, इचलकरंजी, जालना, कोल्हापूर, लातूर, नांदेड, पंढरपूर, पिंपरी-चिंचवड, सांगली आणि सातारा येथील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांच्या खर्चाची बचत करण्यासाठी आणि जलद सेवेसाठी परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून, पासपोर्ट सेवा संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अर्जदारांसाठी सज्ज
पुणे विभागातून 2022 मध्ये 2021 च्या तुलनेत 1 लाख 13 हजारांपेक्षा अधिक म्हणजेच 50 टक्के अधिक पासपोर्ट जारी करण्यात आले. 2023 च्या पहिल्या 3 महिन्यांत मागील वर्षीच्या पहिल्या 3 महिन्यांच्या तुलनेत 40 हजार अधिक पासपोर्ट वितरित करण्यात आले.

दररोजच्या अपॉइंटमेंट
क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. अर्जुन देवरे यांनी सांगितले की, या वर्षी पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) पुणे येथे सामान्य व तत्काळ योजनेच्या अपॉइंटमेंट प्रतिदिन वाढविण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सेवेसाठी दररोजच्या एकूण 2405 अपॉइंटमेंट दिल्या जातात. त्यात सामान्य पासपोर्ट साठी 1970, तत्काळ पासपोर्ट साठी 290 आणि पीसीसी 145 साठी वितरित होतात.

तत्काळ अपॉइंटमेंट अधिक
पासपोर्ट काढण्यासंदर्भात नागरिकांना माहिती नसल्याचा फायदा घेत अनेक एजंट मोठी रक्कम आकारत असल्याचे समजते. सामान्य
(छेीारश्र) श्रेणीच्या पासपोर्टसाठी पंधराशे, तर तत्काल सेवेसाठी दोन हजार रुपये अधिक सरकारी शूल्क आकारले जाते. जास्त रक्कम आकारण्याच्या उद्देशाने अनेक एजंट ग्राहकांना तत्कालच्या श्रेणीकडे वळवतात आणि म्हणून ज्या अर्जदारांना तत्काळची खरोखर गरज आहे, त्यांना तत्काळसाठी अनेक दिवस वाट बघावी करावी लागते.

त्यामुळे, क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाने पासपोर्ट सेवा केंद्र, पुणे येथे दैनंदिन तत्काळ अपॉइंटमेंटची संख्या 100 वरून 250 पर्यंत वाढवली आहे. डॉ. देवरे यांनी आवाहन केले आहे की, गेल्या काही वर्षांपासून, पासपोर्ट प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आली आहे आणि अर्जदार स्वतः ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. सरकारने पासपोर्ट सेवांसाठी कोणत्याही एजंटची अधिकृतपणे नियुक्ती केलेली नाही. सामान्य योजनेंतर्गत अर्ज करा आणि पैसे वाचवा. बहुतेक अर्जदार सामान्य (छेीारश्र) श्रेणी अंतर्गत अर्ज करू शकतात. सामान्य श्रेणी अंतर्गत, अर्जदारांना कमी कागदपत्रे सादर करावी लागतात आणि फक्त मूळ शूल्क भरावे लागते.

कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर विदेशात नोकरीसाठी जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. शिवाय पासपोर्ट नियमात केलेल्या सोप्या बदलामुळे त्वरित पासपोर्ट वितरित केले जात आहेत. पुणे विभागाचे काम पाहता फेब—ुवारी 2023 मध्ये परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी प्रशंसा करून समाधान व्यक्त केले आहे.

                                                       – डॉ. अर्जुन देवरे, पासपोर्ट अधिकारी, पुणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news