Pune Crime : आळेफाटा येथे बंदुकीचा धाक दाखवून दरोडा

Pune Crime : आळेफाटा येथे बंदुकीचा धाक दाखवून दरोडा

Published on

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : Pune Crime : आळेफाटा येथे चार दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील रोख रक्कम पळवून नेल्याची घटना सोमवारी (दि. ७) रात्री साडेदहा वाजता घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आळेफाटा येथे बोरी बुद्रुक येथील अविनाश पटाडे यांचे साई इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश करुन त्यांना बंदुकीचा धाक दाखविला व दुकानातील रोख रक्कम चोरून नेली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

Pune Crime : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

काही दिवसांपूर्वीच चौदा नंबर येथील अनंत पतसंस्थेवर भर दुपारी दरोडा पडला होता, त्यामध्ये पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास अद्याप सुरूच आहे.

ही घटना ताजी असतानाच आळेफाटा येथे पुन्हा बंदुकीचा धाक दाखवून दरोडा पडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यात वारंवार अशा घडत असल्यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, आळेफाटा पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.  पोलीस अधिक तपास करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news