संपूर्ण पुणे शहराचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद; शुक्रवारी उशीरा कमी दाबाने येणार पाणी

संपूर्ण पुणे शहराचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद; शुक्रवारी उशीरा कमी दाबाने येणार पाणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या विविध जलकेंद्रांमधील विद्युत व स्थापत्यविषयक देखभाल-दुरुस्ती साठी येत्या गुरुवारी (दि. 19) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्यांतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर व पर्वती एलएलआर टाकी परिसर, लष्कर जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, भामा-आसखेड जलकेंद्र परिसर, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्रलगत जीएसआर टाकी परिसर, एसएनडीटी (एमएलआर) परिसर, एसएनडीटी (एचएलआर) परिसर व चतुःशृंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परिसर, तसेच कोंढवे-धावडे जलकेंद्र येथील विद्युत/पंपिंग विषयक व स्थापत्यविषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्याने या परिसरातील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news