दिलासादायक ! पुणे शहरात पाच वर्षांत मलेरियाने एकही मृत्यू नाही

दिलासादायक ! पुणे शहरात पाच वर्षांत मलेरियाने एकही मृत्यू नाही
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गेल्या साडेपाच वर्षांत मलेरियामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. 2022 मध्ये केवळ 7 आणि 2023 मध्ये मार्चपर्यंत 6 रुग्णांची नोंद झाली आहे. डासांची पैदास वाढू नये, यासाठी आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, 2017 पासून पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका किंवा ग्रामीण भागात मलेरियामुळे मृत्यूची नोंद झालेली नाही. प्रतिबंध, लवकर निदान आणि योग्य उपचार याद्वारे मलेरिया तसेच इतर साथीचे रोग आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

आकडेवारीनुसार, जिल्ह्यात 2021 मध्ये मलेरियाचे केवळ 30, 2020 मध्ये केवळ 13 आणि 2019 मध्ये 23 रुग्ण आढळले. पुण्यात 2013 मध्ये 376 मलेरियाच्या रुग्णांची नोंद झाली होती आणि फक्त एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. पुढील वर्षात, 253 रुग्ण आणि 4 मृत्यू नोंदवले गेले.

जिल्ह्यातील आकडेवारी

वर्ष        रुग्ण     मृत्यू
2016     146      1
2017     101      0
2018     53        0
2019     23        0
2020     13        0
2021     30        0
2022     14        0
2023      9         0

पाणीसाठ्यांची वेळोवेळी कीटकप्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी. डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरलेल्या गृहनिर्माण सोसायट्या, मालमत्ता, बांधकामांची ठिकाणे अशा वेगवेगळ्या आस्थापनांना महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नोटीस बजावण्यात येते. ही नोटीस म्हणजे तातडीने डासोत्पत्तीची ठिकाणे मालकांनी नष्ट करून स्वच्छ करणे आवश्यक असते. ही नोटीस बजावूनही दुर्लक्ष केल्यास या मालकांकडून दंड वसूल करते.

     डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news