Fukrey 3 : ठरलं तर! पुलकित सम्राटचा फुकरे-3 ‘या’ दिवशी होणार रिलीज

Fukrey 3
Fukrey 3

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. कारण अभिनेता पुलकित सम्राटच्या फुकरे-३ ची (Fukrey 3) रिलीज डेट जाहीर झालीय. हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच चित्रपटगृहात येणार आहे. अपेक्षेपेक्षा आधीची चित्रपट रिलीज होणार असून २८ सप्टेंबर, २०२३ रोजी हा चित्रपट येणार आहे. पुलकितने इन्स्टाग्रामवर फुकरे ३ चे पोस्टरदेखील शेअर केले आहे. (Fukrey 3)

रिलीजच्या तारखेत हा अनपेक्षित बदल झाला असून प्रभासचा बहुप्रतीक्षित ब्लॉकबस्टर 'सालार' डिसेंबरपर्यंत लांबला आहे. पुलकित सम्राटने आपल्या मोहक आणि मनमोहक अभिनयाने चित्रपट रसिकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. फुकरे फ्रँचायझीमध्‍ये हनीची भूमिका नक्कीच कमाल असणार आहे. पुलकित त्याचे विलक्षण सहकलाकार वरुण शर्मा, मनजोत सिंग आणि अली फजल यांच्यासह या लाडक्या कॉमेडी फ्रँचायझीचा भाग आहे.

पुलकित सम्राटचे रसिक फुकरे-३' च्या लवकर रिलीजचा आनंद साजरा करत आहेत. तर 'प्रभास'च्या चाहत्यांना 'सालार'साठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. सालार सप्टेंबरमध्ये रिलीज होणार होता. पण विविध कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news